शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आमचं ठरलंय! मीरा भाईंदर मध्ये शिवसेना शाखा उद्घाटनास उद्धवसेना व मनसे एकत्र

By धीरज परब | Updated: June 10, 2025 17:08 IST

ठाकरी बाणाच्या फलकाने वेधले लक्ष

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: शिवसेनाउद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची चर्चा रंगली असताना मीरारोड मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेच्या उदघाटन फलकावर राज यांच्यासह स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे असलेला आमचं ठरलंय, ठाकरे बाणा चा फलक लावला गेला. शिवाय ठाकरे गट व मनसेचे प्रमुख पदाधिकारी देखील उद्घटनास एकत्र आले होते.

शहरप्रमुख प्रशांत सावंत यांच्या वतीने काशीमीरा प्रभाग क्रमांक १४ मध्ये शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आयोजित केले होते. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे आणि विनोद घोसाळकर यांनी शाखेचे उदघाटन केले. उदघाटन निमित्त शाखेच्या आत तसेच बाहेर देखील शिवसेनेच्या फलकावर उद्धव ठाकरे सह वरिष्ठ नेते व स्थानिक पदाधिकारी यांची छायाचित्रे होतीच पण मनसे प्रमुख राज ठाकरे सह मनसेच्या मीरा भाईंदर मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे त्यावर होती. फलकावर आमचं ठरलंय.. ठाकरी बाणा महाराष्ट्रासाठी लढणारा, महाराष्ट्रद्रोह्यांना भिडणारा असा मजकूर देखील आहे.

या उदघाटनास १४६ विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा,  महिला संपर्क प्रमुख रोशनी कोरे- गायकवाड, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, महिला जिल्हा संघटक नीलम ढवण, उपजिल्हाप्रमुख धनेश पाटील, उपजिल्हा संघटक सुप्रिया घोसाळकर, प्राची पाटील, माजी जिल्हा संघटक स्नेहल सावंत,  १४६ विधानसभा संपर्क प्रमुख मनोज मयेकर, युवासेना जिल्हाध्यक्ष दीपेश गावंड,  महिला शहर संघटक मनीषा फोफळे, नरेंद्र उपरकर, सुषमा नाईक, उषा उघाडे  आदी ठाकरे गटाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

मीरा भाईंदर मनसे अध्यक्ष संदीप राणे, महिला शहर अध्यक्ष कविता वायंगणकर, १४६ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन पोपळे तर १४५ चे संतोष शिंगाडे, सचिव सचिन साळुंखे, विद्यार्थी सेना अध्यक्ष रॉबर्ट डिसोझा, सचिव प्रकाश शेलार, उप अध्यक्ष लक्ष्मी गाडेकर, करण कांडणगिरे आदी मनसे पदाधिकारी सह मनसैनिक उपस्थित होते. 

यावेळी उद्धव आणि राज ठाकरे बंधूनी एकत्र येऊन बाळासाहेबांची खरी शिवसेना पुन्हा देशाला दाखवून द्यावी. शिवसेना व मनसे संपवण्यासाठी कारस्थाने करणाऱ्या विरोधी राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून महाराष्ट्र हित जपावे अश्या भावना शिवसैनिक व मनसैनिकांनी बोलून दाखवल्या.

टॅग्स :mira roadमीरा रोडShiv SenaशिवसेनाMNSमनसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे