शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल', मराठी तरुणावरच दादागिरी; घेऊन गेले पोलीस ठाण्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 22:52 IST

मुंब्रामध्ये एक घटना घडली असून, मराठीमध्ये बोल असं म्हणणार्‍या तरुणालाच दमदाटी करण्यात आली. 

Mumbra News Video: 'इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात राहता, मराठीमध्ये बोला', असा आग्रह धरणाऱ्या एका मराठी तरुणालाच कान धरून माफी मागायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंब्रामध्ये ही घटना घडली असून, तरुणाला जमावाने घेरले आणि त्याला जबरदस्ती माफी मागायला लावल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

नेमकं काय घडलं, वाद का झाला?

एका फळविक्रेत्याजवळ तरुण गेला. त्याने कसे दिले म्हणून विचारले. त्यावर फळविक्रेत्याने हिंदीत उत्तर दिले. त्यावर तरुण म्हणाला की, पन्नास रुपये घे. फळविक्रेता म्हणाला की, मला मराठी येत नाही. त्यावर तरुण म्हणाला की, मराठी येत नाही, किती वर्ष झाली महाराष्ट्रात येऊन. महाराष्ट्रात राहायचं असेल, तर मराठी आलीच पाहिजे. मी मुंब्रा बंद करून टाकेन', असं तो तरुण म्हणाला. 

तरुणाला घेरलं, दमदाटी करून माफी मागायला लावली

यावरूनच वाद झाला. त्यानंतर त्या विक्रेत्याने गर्दी जमवली आणि मराठी तरुणाला दमदाटी सुरू केली. जमावाने त्याला घेरले. 'आम्हाला मराठी बोलता येत नाही. आम्ही मराठी बोलणार नाही काय करायचं ते कर, असे काही जण म्हणतात. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तरुण माफी मागत असताना काही जण म्हणतात की, आम्हाला मराठी येत नाही, हिंदीत बोल. आजूबाजूला गर्दी जमल्यानंतर तरुणाने माझ्याकडून चूक झाली मला माफ करा, अशी कान धरून माफी मागितली. 

पण, तरीही वाद शमला नाही. त्यानंतर काही जणांनी त्याला मुंब्रा पोलीस ठाण्यात नेले. त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, मराठी तरुणाला माफी मागायला लावल्याबद्दल सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

टॅग्स :mumbraमुंब्राSocial Mediaसोशल मीडियाmarathiमराठीSocial Viralसोशल व्हायरल