-प्रकाश जाधव, मुरबाड (जि. ठाणे) मुरबाड तालुक्यातील ११७ पर्यटक नेपाळमधील काठमांडू आणि पोखरामध्ये अडकले आहेत. मात्र, आमची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नसल्याची माहिती पर्यटक म्हणून गेलेले मिलिंद मडके व माजी नगराध्यक्षा अर्चना विशे यांनी ‘लोकमत’ला दिली.
तालुक्यातील अनेक पर्यटक हे सालाबादप्रमाणे नेपाळमध्ये पशुपतिनाथ मंदिरात गेले आहेत. मडके, रामभाऊ दळवी, सुधीर तेलवणे, महेंद्र तोंडलीकर, अर्चना विशे, नितीन सूर्यवंशी, संध्या कदम, संगीता साबळे असे अनेक प्रवासी अडकून पडले आहेत.
त्यातील काही पर्यटकांनी परतीच्या प्रवासासाठी विमानाची, तर काहींनी रेल्वेची तिकिटे काढलेली आहेत. आता विमानसेवा पूर्ववत होण्याची वाट पाहत आहोत, असे पोखरा येथून नितीन सूर्यवंशी यांनी सांगितले.