शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अशाप्रकारे दाऊद इब्राहिम आणि इक्बाल कासकर करत होते एकमेकांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 12:38 IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक झाल्यापासून एकामागोमाग एक खुलासे होत आहेत. मिळालेल्या नवीन माहितीनुसार, दोघे भाऊ एकमेकांशी चॅटच्या माध्यमातून संपर्कात होते.

ठळक मुद्देदाऊद इब्राहिम आणि इक्बाल कासकर एकमेकांशी चॅटच्या माध्यमातून संपर्कात होते तपासादरम्यान इक्बाल कासकरचं जीमेल अकाऊंट पोलिसांच्या हातीपोलिसांची मोबाइल फोनवर सतत नजर असल्याने दाऊद आणि इक्बाल कासकरने हा मार्ग अवलंबला होता

ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक झाल्यापासून एकामागोमाग एक खुलासे होत आहेत. मिळालेल्या नवीन माहितीनुसार, दोघे भाऊ एकमेकांशी चॅटच्या माध्यमातून संपर्कात होते. तपासादरम्यान इक्बाल कासकरचं जीमेल अकाऊंट पोलिसांच्या हाती लागलं आहे. दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. एका खंडणी प्रकरणामध्ये इक्बाल कासकरला अटक करण्यात आली. पोलिसांची मोबाइल फोनवर सतत नजर असल्याने दाऊद आणि इक्बाल कासकरने हा मार्ग अवलंबला होता. 

डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितलं आहे की, 'पोलिसांच्या हाती इक्बाल कासकरचं जीमेल अकाऊंट लागलं आहे. आम्ही गुगलकडे पासवर्ड आणि इतर माहितीही मागितली आहे'.

मुलाने तयार करुन दिलं अकाऊंट जीमेलचा तपास केल्यानंतर आणखी महत्वाचे पुरावे हाती लागतील अशी पोलिसांना अपेक्षा आहे. यामुळे दाऊद इब्राहिम आणि इक्बाल कासकरभोवती फास आवळण्यास मदत मिळेल. इक्बाल कासकरच्या मोबाइल फोनची तपासणी केली असताना पोलिसांना या जीमेल आयडीची माहिती मिळाली. चौकशीदरम्यान इक्बाल कासकरने पोलिसांना सांगितलं की, मेल अकाऊंट माझ्या मुलाने तयार केलं आहे आणि पासवर्ड फक्त त्यालाचा माहिती आहे. मला मेल अकाऊंट वापरता येत नाही असा दावा इक्बाल कासकरने केला आहे. मात्र पोलिसांना त्याच्यावर विश्वास नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्बाल कासकर मेल आणि इंटरनेटच्या सहाय्याने दाऊदसहित कुटुंब आणि अंडरवर्ल्डमधील इतर सदस्यांच्या संपर्कात होता. 

इक्बाल कासकरच्या मेलशी संबंधित सर्व लोकांवर पोलिसांची नजर आहे. सोबतच इक्बाल कासकरची एकाहून जास्त ई-मेल अकाऊंट असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ठाणे पोलिसांचं सायबर सेल जीमेलवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत आहे. 

'दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, फोन टॅप होत असल्याच्या भीतीने कॉल करत नाही'इकबाल कासकरने पोलिसांना याआधी माहिती दिली होती की, 'फोन टॅप होत असल्याच्या भीतीने दाऊद गेल्या तीन वर्षांपासून माझ्याशी आणि इतर नातेवाईकांशी बोलणं टाळत आहे'. मात्र आपण आपला दुसरा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचा दावा त्याने केला होता. आपल्या आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन अनीस ईद आणि इतर सणांना फोन करतो असं इकबाल कासकरने सांगितलं होतं. 'इकबाल कासकर तपासात सहकार्य करत नसून बोलण्यास नकार देत आहेत. मात्र त्याने आपण 1993 स्फोटातील आरोपी आपला मोठा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचं मान्य केलं आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली. 

 

 

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा