शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लाटांनी घेतला बोटीचा बळी, सातपाटीजवळ समुद्रातील थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 01:45 IST

सातपाटीजवळ समुद्रातील थरार : १५ खलाशांचे प्राण वाचले

हितेन नाईकपालघर : समुद्रातील वादळीवाऱ्याचा फटका बसून सातपाटीच्या किनाºयावर येणारी ‘प्राजक्ता’ ही मासेमारी नौका दगडी बंधाºयावर अडकून पडल्याने तिला वाचवण्याचे स्थानिक मच्छीमारांचे प्रयत्न फोल ठरले. दुपारी दुसऱ्यांदा केलेल्या प्रयत्नात लाटांच्या फटकाºयाने या नौकेचे तुकडेतुकडे झाले. बोटीत असलेले लाखो रुपयांचे साहित्यही नष्ट झाले आहे. मात्र, नौकेतील १५ मच्छीमारांनी समुद्रात उड्या घेऊ न आपले प्राण वाचवले. या दुर्घटनेमुळे चौधरी कुटुंब आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहे.

सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे सभासद असलेले मोरेश्वर चौधरी यांच्या मालकीची ‘प्राजक्ता’ ही नौका २ आॅगस्टला मासेमारीसाठी समुद्रात रवाना झाली होती. ३ आॅगस्टपासून वादळीवाºयामुळे मासेमारी न करताच ४ आॅगस्टला ही बोट परतत होती. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही नौका सातपाटीच्या समुद्रात पोहोचली. मुसळधार पावसामुळे नौकानयनमार्गच दिसेनासा झाला होता. त्यामुळे तांडेल जितेश चौधरी यांनी आपल्या नौकेची लोखंडी लोयली (अँकर) समुद्रात टाकून एका जागी स्थिर राहण्याचे ठरवले. मात्र, वादळाचा वेग वाढल्याने ही नौका फरफटत किनाºयावरील दगडी बंधाºयाजवळ पोहोचल्याचे नौकेतील मच्छीमारांना कळलेच नाही. ही नौका बंधाºयावर आपटू लागल्याने मोबाइलवरून स्थानिक मच्छीमारांना संपर्क केल्यावर अनिल चौधरी, सनी चौधरी, मुकेश मेहेर, अभी मेहेर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, लाटांपुढे त्यांचे काही चालले नाही.चौधरी कुटुंबीयांवर संकट : शासनाच्या एनसीडीसी योजनेंतर्गत १० ते १२ लाख कर्ज आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सहकारी संस्थांद्वारे घेतलेल्या पाच लाखांच्या कर्जातून उभारलेली नौका पूर्ण उद्ध्वस्त झाल्याने चौधरी कुटुंबावर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अर्थार्जनाचे साधनच दर्याराजाने हिरावून घेतल्याने आता खायचे काय, असा सवाल चौधरी कुटुंबातील महिला करत आहेत. 

टॅग्स :thaneठाणेVasai Virarवसई विरारRainपाऊस