शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

वाकण-खोपोली रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:13 IST

वाकण-खोपोली या राज्यमार्गावरून होणाºया वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक तसेच जिंदाल, जेएसडब्लू या बड्या कंपनीच्या कॉईल व पाइपच्या अवजड वाहतुकीमुळे

पाली : वाकण-खोपोली या राज्यमार्गावरून होणाºया वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक तसेच जिंदाल, जेएसडब्लू या बड्या कंपनीच्या कॉईल व पाइपच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या ओव्हरलोड व अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची चाळण झाली आहे. तेव्हा उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देवून ओव्हरलोड वाहतूक करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होतआहे.या मार्गावरील अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. तसेच या खड्डेमय मार्गावरून दररोज प्रवास करणाºया दुचाकीस्वारांना कंबरेचे व मणक्याचे आजार होत आहेत. मात्र या सर्व गंभीर बाबींकडे संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवाशांसह नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या मार्गावरती पाली व जांभूळपाडा येथे ब्रिटिशकालीन दोन पूल आहेत.या पुलांची भारवहनक्षमता फक्त १९ टन इतकीच असून आजघडीला येथून ५० ते ६० टन भारवहनक्षमतेच्या वाहनांची अवजड वाहतूक होत आहे. त्यामुळे या पुलाला धोका असून पुन्हा एकदा सावित्री पुलासारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.नेरळ : कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या नेरळ - कळंब जिल्हा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना याच मार्गावरील नेरळ साईमंदिर परिसरातही रस्त्याची चाळण झाली आहे. तसेच रस्ताही खचला आहे, परंतु याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.नेरळ-कळंब या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरूच असते, या रस्त्यावरील साईमंदिर परिसरात मागील वर्षी रस्त्याच्या कडेला जेसीबीच्या साहाय्याने पाणी जाण्यासाठी नाल्या काढण्यात आल्या होत्या, परंतु यावर्षी पाणी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याने सर्व पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.याच रस्त्यावर पुढे काही भाग खचला आहे. त्याठिकाणी मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहे. परंतु येथून भरधाव वेगाने जाणाºया वाहनचालकांना हा खड्डा न दिसल्यास रात्रीच्या वेळी येथे अपघात घडू शकतो. त्यामुळे हा खचलेला रस्ता चांगल्या दर्जाचा कधी करणार असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना पडला आहे.या वाहतुकीमुळे अपघातात वाढसुप्रीम, जिंदाल, जेएसडब्लू या कंपनीच्या मालाची अवजड वाहतूक व वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक या मार्गावरून राजरोसपणे होत असल्याने ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच वाळू, कोळसा, खडी, ग्रीट यांची ओव्हरलोड वाहतूक करताना त्या वाहनामधील माल रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे दुचाकी वाहने सरकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.