शहरं
Join us  
Trending Stories
1
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
2
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
3
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
4
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
5
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
6
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
7
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
8
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
9
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
10
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
11
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
12
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
13
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
14
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
15
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
16
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
17
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
18
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
19
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
20
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा

ठाणे स्टेशन परिसराची कोंडी फोडण्यासाठी पालिकेचा पार्कींगचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 3:50 PM

स्टेशन परिसरातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने आता मैदानावर, उद्यानाच्या खाली, मैदानाच्या खाली आणि खाजगी भुखंडाच्या ठिकाणी पार्कींगची सेवा उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु केली आहे.

ठळक मुद्देगावदेवी मैदानात १२० दुचाकी आणि १३० चारचाकी वाहनांची होणार पार्कींगशिवाजी मैदानात पार्कीगची सुविधा

ठाणे - जांभळी नाका ते स्टेशन, नौपाडा, गावदेवी या भागातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी आणि स्टेशन परिसर वाहतुक कोंडी मुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने या भागात भुमिगत तसेच मैदानात आणि खाजगी भुखंडाच्या ठिकाणी पार्कींगची सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गावदेवी मैदानाच्या खाली त्याच्या बाजूला असलेल्या उद्यानाच्या खाली, शिवाजी मैदान आणि स्टेशन परिसरातील खाजगी मोकळ्या भुखंडावर या पार्कींगच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.                  स्टेशन परिसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी या भागात सॅटीस प्रकल्प उभारण्यात आला. परंतु त्यानंतरही येथील कोंडी फुटु शकलेली नाही. उलट त्या कोंडीत आणखीनच भर पडल्याचे दिसून आले. नौपाड्यातील गावदेवी भागात, जांभळीनाका, बाजारपेठ आदी भागातही रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जात आहेत. येथे रस्ता रुंदीकरण शक्य नसल्याने आहे त्याच रस्त्याच्या ठिकाणी नव्याने काही प्रयोगही करण्यात आले आहेत. परंतु पार्कींगची सुविधा या भागात उपलब्ध नसल्याने या भागातील कोंडी आजच्या घडीला सुध्दा सुटु शकलेली नाही. सध्या गावदेवी भाजी मंडईच्या ठिकाणी दुचाकी पार्कींगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानंतर आता दुसºया टप्यात गावदेवी मैदानाखाली भुमिगत पार्कींग सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत पावले उचलण्यात आली असून याची निविदा पुढील आठवड्यात निघेल अशी आशा पालिकेने व्यक्त केली आहे. त्यानुसार या मैदानाच्या खाली १२० दुचाकी आणि १३० चारचाकी वाहनांची पार्कींगची सुविधा उपलब्ध असणार आहे. यासाठी स्मार्टसिटी अंतर्गत २७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

  • स्टेशन परिसराची वाहतुक कोंडीतून सुटका व्हावी आणि दुरवर कामाला जाणाºया चाकरमान्यांना स्टेशन परिसरात पार्कींगची सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही पावले उचलण्यात आली आहेत.

(सुनील चव्हाण - अतिरिक्त आयुक्त, ठामपा)

           दुसरीकडे आता या मैदानाच्या बाजूलाच असलेल्या उद्यानाच्या खाली देखील अशा स्वरुपात भुमीगत पार्कींगची सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. याशिवाय स्टेशन परिसरातील खाजगी भुखंड शोधण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. जे भुखंड मोकळे असतील त्या ठिकाणी काही महिने का होईना भाडेतत्वावर पार्कींगची सेवा उपलब्ध करुन देण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यानुसार दोन, तीन भुखंड पालिकेने शोधले आहेत. याशिवाय जांभळी नाका भागातील शिवाजी मैदानाच्या ठिकाणी देखील दिवसभर पार्कींगची सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी पालिकेने हालाचाली सुरु केल्या आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त