शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

उल्हासनगरमध्ये पाणी पेटणार

By admin | Published: March 08, 2017 4:16 AM

पालिका निवडणुकीचा घुरळा खाली बसताच पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे. अनियमित पाणापुरवठ्यामुळे नागरिक संतप्त झाले असून परिस्थितीत

उल्हासनगर : पालिका निवडणुकीचा घुरळा खाली बसताच पाणीटंचाईने पुन्हा डोके वर काढले आहे. अनियमित पाणापुरवठ्यामुळे नागरिक संतप्त झाले असून परिस्थितीत सुधारणा झाली नाहीतर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. अनियमित पाणीपुरवठयामुळे नागरिक कुठल्याही क्षणी रस्त्यावर उतरु शकतात असा इशारा देणारे पत्र एमआयडीसीला दिले आहे. एमआयडीसीकडून अनिमियत पाणीपुरवठा होत असल्याचे तुणतुणे पालिका सातत्याने वाजवत आहे. एमआयडीसीच्या पाणी तक्त्यावरून लोकसंख्येच्या प्रमाणात दुप्पट पाणीपुरवठा होत असल्याचे उघड झाले आहे. मग वाढीव पाणी जाते कुठे? असा सवाल विचारला जात आहे. मुबलक पाणीपुरवठ्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने ३०० कोटीची पाणीवितरण योजना राबविली. पालिका प्रशासन व सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या दुर्लक्षतेमुळे योजना ठप्प पडली. मुख्यमंत्र्यांनी योजनेच्या चौकशीचे आदेश दिले. त्याचे पुढे काय झाले? केवळ कागदीघोडे नाचविण्यात धन्यता मानली जात आहे.शहरातील कॅम्प नं-४ ओटी सेक्शन, संभाजी चौक, सत्यसाई शाळा परिसर, दहाचाळ, तानाजीनगर, समातानगर, करोतियानगर, डॉल्फिन हॉटेलसह संपूर्ण शहरामध्ये पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. या भागात आठवड्यातून तीन ते चार दिवस अनियमित व अर्धा तास पाणीपुरवठा होतो. याबाबत आयुक्तांकडे तक्रारींचा पाऊस पडला असून अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर पाणीसमस्या सोडविणार असल्याचे सांगितले. यापूर्वी ज्या भागात पाणीटंचाई निर्माण झाली त्याची थेट चौकशी करून समस्या सोडविली जात होती. त्यामुळे नागरिकांचे समाधान होऊन कमीतकमी पिण्यासाठी त्यांना पाणी मिळत होते. आता मात्र तसे होताना दिसत नसल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या परिसरातील नागरिकांनी ५० टक्यापेक्षा कमी मालमत्ता कर भरला त्यांना सुविधा देणार नाही अशी भूमिका निंबाळकर यांनी गेल्यावर्षी घेतली होती. तसेच थकित मालमत्ता कर वसुलीसाठी थकीत मालमत्ताधारकांच्या घरासमोर किन्नरांचा बँडबाजा वाजविणार असा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. मग पिण्याचे पाणी न देणाऱ्या पालिकेसमोर किन्नरांना का नाचवू नये? असा प्रश्न गेल्यावर्षी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरूण अशांत यांनी आयुक्तांना विचारून खळबळ उडून दिली होती. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)निंबाळकर हे तुकाराम मुंढेंच्या मार्गावर- महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहर कचरामुक्त केले. तसेच थकित मालमत्ता कर वसुलीसह इतर निर्णय अचूक घेतल्याने नागरिक त्यांच्या पाठिशी उभे राहिले. - कालांतराने नगरसेवकांसह नागरिक, समाजसेवक यांच्या तक्रारी ऐकायला त्यांना वेळ नसल्याचा आरोप होत आहे. असेच राहिल्यास नवी मुंबई प्रमाणे आयुक्तांविरोधात ठराव आणावा लागेल, अशी पुस्ती बहुतांश नगरसेवकांनी जोडली. दिवसाला १२० टँकरच्या फेऱ्या : गेल्यावर्षी पाणीटंचाईमुळे शहरात दिवसाला १६० च्या आसपास टँकरच्या फेऱ्या होत होत्या. सध्या टंचाईग्रस्त भागात १०० ते १२० फेऱ्या होत आहेत. शहरातील ७० टक्के हातपंप सुरु आहेत. तेथूनच नागरिक घेऊन जात असल्याचे सध्याचे चित्र आहे. श्रीमंतांच्या परिसरात मुबलक पाणीएमआयडीसीकडून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले जाते. झोपडपट्टी भागात आठवडयातून दोन ते तीन दिवस अपुरा पाणीपुरवठा तर गर्भश्रीमंत परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत आहे. गेल्यावर्षी टंचाईच्यावेळी निळया पाईपला तोटया नसल्याने लाखो लिटर पाणी गटारत जात असल्याचे आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात उघड झाले असून अद्यापही तोटया बसविल्या नसल्याचे उघड झाले आहे.