शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत वॉटर हार्वेस्टिंगवर फेरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:33 AM

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष; पाणीटंचाई मिटविण्यापेक्षा बिल्डरहिताला सत्ताधाऱ्यांचे प्राधान्य

ठाणे : भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे महापालिका आणि कल्याण महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत. यात इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केले आहे. परंतु, २०१२ पासून ते मे २०१९ पर्यंत ठाण्यात १३४६ प्रकल्पांनी ही संकल्पना राबविल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तर, कल्याणमध्ये १२०७ प्रकल्पांनी हा प्रकल्प राबविला आहे. मात्र, यासाठी जे काही प्रयत्न करणे अपेक्षित होते, त्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कमी पडल्याचे दिसत आहे. यामागे बिल्डरहित साधून आपले अर्थकारण साजरे करणे, हाच उद्देश दिसत आहे. उल्हासनगरमध्ये तर एकाही इमारतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले नसल्याची बाब समोर आली आहे. एकूणच प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आजही म्हणावी तितक्या वेगाने ही योजना अमलात येताना दिसत नाही.रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे पालिकेची १०० ब्लॉकच्या मागे दररोज २० हजार लीटर पाण्याची बचत होत आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबविण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. ठाणे महापालिकेने २००८ मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पना पुढे आणली. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून नवीन इमारतींना ती सक्तीची केली आहे. महापालिका हद्दीत आजघडीला इमारतधारकांसाठी ७९ हजार ५५० कनेक्शन देण्यात आले आहे. त्यानुसार, एक लाख ९८ हजार ९१९ कुटुंबांना या कनेक्शनचा फायदा होत आहे. तर, कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून २००८ सालापासून जून २०१९ पर्यंत १२०३ इमारतींनी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा लागू केली असल्याचा दाखला दिला आहे. परंतु, रेन वॉटर हार्वेस्टिंगची देखभाल दुरुस्ती सोसायट्यांकडून केली जात नसल्याने त्याचा उपयोग होत नाही. पावसाचे पाणी जमिनीत मुरवले जात नाही. ते थेट नदी, नाले, खाडीला जाऊन मिळत आहे. यामुळे ही संकल्पानाच मोडीत निघाली आहे.आठ वर्षांतील रेन वॉटर हार्वेस्टिंगला दिलेल्या परवानग्या2012-13या कालावधीत शहरातील १८५ इमारतींना परवानगी दिली.2013-14या कालावधीत २१२ प्रकल्पांना मंजुरी दिली.2014-15या कालावधीत शहरातील १५७ इमारतींना परवानगी दिली.2015-16या कालावधीत शहरातील १७९ इमारतींना परवानगी दिली.2016-17या कालावधीत शहरातील ५५ इमारतींना परवानगी दिली.2017-18या कालावधीत शहरातील ३५९ इमारतींना परवानगी2018-19या कालावधीत शहरातील १८३ इमारतींना परवानगी28 मे 2019 पर्यंतया कालावधीत शहरातील १६ इमारतींना परवानगी2008-19या कालावधीत कल्याणमध्ये १२०७ इमारतींना परवानगीउल्हासनगर महापालिकेने तर रेन वॉटरचा एकही प्रकल्प राबविलेला नाही.असे केले जाते जलपुनर्भरणपावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात. तर, काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरवेल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी उपयोगी आहे.जलपुनर्भरणाचे हे आहेत फायदेपाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. जलसंधारणामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते.जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी वर खेचण्यासाठी लागणाºया विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे, पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते.गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती तुलनेने अवलंबण्यास सोप्या आहेत. जलसंधारणाच्या बºयाच पद्धती या घरबांधण्यासाठी, वापरण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.निसर्गात स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणाºया पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे.प्रयत्न पडतात अपुरे : शहरात आजघडीला सुमारे १३४६ इमारतींवर आणि महापालिकेच्या शाळा, प्रभाग कार्यालये, अग्निशमन केंदे्र अशा १० ठिकाणी म्हणजेच एकूण १३४६ ठिकाणी हा प्रकल्प सुरू आहे. परंतु, आता भविष्यातील पाणीसंकट पाहता पालिकेने २००५ पूर्वीच्या जुन्या इमारतींनादेखील रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या प्रयत्नात पालिका कमी पडल्याचे दिसत आहे. त्यात मागील काही महिन्यांत नव्याने या प्रकल्पाला मंजुरी दिली नसल्याची माहिती पालिकेने दिली.महापालिकेच्या सर्व कार्यालयांत प्रकल्प राबविणारठाणे महापालिकेमार्फत मागील वर्षी काही प्रभाग समित्यांवर ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु आता शाळा, आरोग्य केंद्र तसेच पालिकेच्या इतर कार्यालयांमध्येसुद्धा या पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसा प्रस्तावही तयार केला जात आहे.- अर्जुन अहिर, पाणीपुरवठा अधिकारी,ठामपा

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली