शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

Ulhasnagar: उल्हासनगरात पाणी टंचाई, नागरिक त्रस्त, जलवाहिनी आणि जलकुंभाला गळती

By सदानंद नाईक | Updated: June 13, 2023 19:58 IST

Water shortage in Ulhasnagar:

- सदानंद नाईकउल्हासनगर - शहरातून बारामाही वाहणारी उल्हास नदी असूनही महापालिकेची स्वतःची पाणी पुरवठा योजना नाही. पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागत असून शहरातील बहुतांश ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न उभा ठाकला आहे.

उल्हासनगरच्या हद्दीतून वाहणाऱ्या उल्हास नदीवर संच्युरी कंपनीची स्वतःची पाणी पुरवठा योजना आहे. तसेच नदी पात्रातून एमआयडीसी पाणी उचलून शहराला पाणी पुरवठा करीत आहेत. शहराला मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी उल्हास नदीवरील पाणी पुरवठा योजना उल्हासनगर महापालिकेला हस्तांतरण करण्याची मागणी जुनी आहे. दरम्यान या प्रक्रियेला गती आली होती. मात्र नंतर ही योजना रेंगाळली आहे. तर शहर पूर्वेला एमआयडीसीच्या पालेगाव जलकुंभातून व जलवाहिनीतून पाणी पुरवठा होतो. दरम्यान महापालिकेने ४०० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजने अंतर्गत ११ नवीन जलकुंभ, एक भूमिगत जलकुंभ, पंपिंग स्टेशन उभारले आहे. त्याच बरोबर ५५ हजार पाणी मीटर बसविण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र ५५ हजार पाणी मीटर गेले कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

शहरातील सुभाष टेकडी परिसरातील नागसेननगर, आम्रपालीनगर, साईनगर, महात्मा फुले कॉलनी, कुर्ला कॅम्प परिसर, संतोषनगर, महादेवनगर, गायकवाड पाडा, गणेशनगर, ज्योती कॉलनी, राहुलनगर, शांतीनगर, इमली पाडा आदी ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली असून महिलांनी दोन दिवसांपूर्वी थेट पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयावर धडक दिली होती. पाणी पुरवठा विभागाचे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकारी अभियंता पद रिक्त असून विभागात बहुतांश पदे प्रभारी आहेत. त्यामुळे विभागात सावळागोंधळ उडाल्याचे चित्र आहे. नव्याने हातपंप खोदणे व हातपंप दुरुस्तीवर दरवर्षी लाखोचा खर्च करूनही ३० टक्के पाणी गळती कायम आहे. तसे महापालिका अधिकारीच जाहीरपणे सांगत आहेत. एकूणच पाणी पुरवठा विभागाला सक्षम अधिकारी व कार्यकारी अभियंता पदाची गरज आहे. विभागात २५० पेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करीत आहेत. मात्र कोणत्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत काम करतात. हा संशोधनाचा विषय झाला आहे.

राजकीय नेत्यांनी बघायची भूमिका महापालिका निवडणुका येताच भावी नगरसेवकात वाढ होऊन नागरिकांचे कामे करतात. मात्र महापालिका निवडणूक लांबणीवर पडल्याने, माजी नगरसेवकासह भावी नगरसेवकही आज पाहायला मिळत नसल्याने, नागरिकांचे पाणी टंचाई प्रश्न तसाच टांगलेला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातulhasnagarउल्हासनगरthaneठाणे