शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

वाहतूककोंडी वाढून पाणीटंचाई तीव्र होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:42 IST

नागरी समस्यांनी त्रस्त असलेली एमएमआरडीए क्षेत्रातील नऊ महानगरे पाणीटंचाई, वाहतूककोंडीसह इतर पायाभूत सुविधांअभावी त्रस्त होणार आहेत.

- नारायण जाधव ठाणे : रायगड आणि ठाणे जिल्ह्यात येऊ घातलेल्या पाच (इंटिग्रेटेड टाउनशिप) अर्थात खासगी एकात्मिक नगरवसाहतींमुळे आधीच नागरी समस्यांनी त्रस्त असलेली एमएमआरडीए क्षेत्रातील नऊ महानगरे पाणीटंचाई, वाहतूककोंडीसह इतर पायाभूत सुविधांअभावी त्रस्त होणार आहेत. सध्या या पाच वसाहतींच्या पार्श्वभूमीवर विकासक आणि सरकार प्रदेशातील जागांचे भाव वाढणार असल्याचे सांगत असले तरीसर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा बसणार असून एमएमआरडीएचे नियोजन कागदावरच आहे.पनवेल, पेण-अलिबागसह भिवंडी आणि कल्याण-डोंबिवलीच्या शीळफाटा परिसरात सध्या मोठ्या वेगाने लोकसंख्या वाढत असून वाढत्या लोकसंख्येनुसार या परिसरात वाहतूककोंडी, आरोग्य सुविधा, प्रदूषण यासह शैक्षणिक सुविधांची वानवा यासारख्या अनेक समस्या आहेत. यातजेएनपीटीतून देशातील अन्य भागांत जाणारे कंटेनर या मार्गांवरून धावतात. त्यामुळे येथे वाहतूककोंडी, ध्वनी आणि वायुप्रदूषण नित्याचे आहे. आता वसाहतींमुळे त्यात आणखी भर पडणार आहे.पाणीटंचाई तीव्र होणारसध्या महानगर प्रदेशातील शहरी भागातच आजघडीला पाण्याचा सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतका प्रचंड तुटवडा असल्याचे एमएमआरडीएने आपल्या २०१६-३६ च्या विकास आराखड्यात म्हटले आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. २०११ ते आता २०१७ पर्यंत लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. बारवीची उंची आणि मध्य वैतरणा वगळता पाण्याचे स्रोतात तसूभरही वाढ झालेली आहे. सरकारने काळू, शाई, गारगाई, पिंजाळ, दमणगंगा, सुसरी, पोशीर यासारखी जी धरणे प्रस्तावित केली आहेत. त्यांच्यासाठी जमीनच संपादित झालेली नाही.सध्या वसई-विरार आणि मीरा-भार्इंदरला ३०८ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर पाण्याची गरज १३०७ दशलक्ष लीटर आहे. मात्र, सध्या भातसा, तानसा, वैतरणा, बारवी, चिखलोली आणि शहाड -टेमघरमधून १२१२ लीटरच पाणी मिळत आहे. शिवाय कर्जत-खालापूर परिसराला १२ दशलक्ष तर नवी मुंबई विमानतळा परिसरात २७ दशलक्ष लिटर पाण्याचा तुटवडा आहे. नव्या पाच एकात्मिक वसाहतींमुळे पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवणार आहे. (उत्तरार्ध)>कॉरिडोर, मेट्रोवरनजर ठेवून जागाखरेदीएमएमआरडीए क्षेत्रातील ज्या भागांत या पाच टाउनशिप येत आहेत. त्याच भागांतून ठाणे-कल्याण-भिवंडी मेट्रो, कल्याण-तळोजा मेट्रो जाणार आहेत. शिवाय, केंद्र सरकारचा जेएनपीटी ते नवी दिल्ली फ्रेट कॉरिडोर आणि एमएमआरडीएचाच बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर जाणार आहे. यामुळे नगरविकास आणि एमएमआरडीएच्या नियोजन विभागातील काही वरिष्ठांना हाताशी धरून या धनदांडग्या बिल्डरांनी या जागा आधीच खरेदी करून त्याठिकाणी टाउनशिप उभारण्याचा सपाटा लावल्याची चर्चा आहे.