शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात योजना राबवूनही पाणी टंचाई हटेना

By अजित मांडके | Updated: March 6, 2024 16:22 IST

४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा.

अजित मांडके, ठाणे :  ठाणे जिल्ह्यातील गाव पाड्याना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा पोहोचत असतात. त्यामुळे येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जलजीवन मिशन, विंधन विहीर अशा विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. हर घर नळाद्वारे पाणी या योजनेंतर्गत लाखो कुटुंबियांची पाण्याची भटकंती थांबल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असतांना दुसरीकडे, मार्च महिन्यातच शहापूर तालुक्यातील ४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. 

ठाणे जिल्ह्यात दरवर्षी मार्च ते मे या तीन महिन्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या भेडसावत असते. तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार केला होता. जिल्ह्याला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागते ते अगदी जून-जुलैपर्यंत ही पाणी टंचाईची झळ सोसावी लागते. 

त्यासाठी दरवर्षी कोट्यावधींचा निधी खर्चून टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, विहीरी खोलीकरण, गाळ काढणे, नविन विंधन विहीर घेणे आणि विंधन विहींची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात येत असतात. यामध्ये नळ पाणी पुरवठा योजनेसह पूरक नळ पाणी पुरवठा योजनेवर सर्वाधिक खर्च अपेक्षित धरण्यात येत असतो. त्यात जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेली कामे यांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला असून ग्रामीण भागातील अनेक गावपाड्यांची पाणी टंचाई मुक्तीकडे वाटचाल सुरु झाल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.

दरम्यान,  असे असले तरी, मार्च महिन्यातच शहापूर तालुक्यात पाणी टंचाईची दाहकता कायम असल्याचे चित्र दिसून येत असून या तालुक्यातील ४२ गावापाड्यांवर १५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची बाबा समोर आली आहे.

 ही आहेत गावपाड्यांची संख्या : शहापूर तालुक्यातील गावांची नावे फूगाळे, दांड, काळभोंड, कोथळे, माळ, विहिगाव, उमरावणे, उंबरखांड तर, नाराळवाडी, पारधवाडी, अघणवाडी, भुईपाडा, चिंतामणवाडी, कोळीपाडा, वारली पाडा आदी पड्यांची नवे आहेत.

टॅग्स :thaneठाणेwater scarcityपाणी टंचाई