कचऱ्यामुळे होतेय जलप्रदूषण, आधारवाडी डम्पिंग ओव्हरफ्लो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 01:10 AM2019-11-26T01:10:55+5:302019-11-26T01:16:41+5:30

कल्याण शहरातील ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपली आहे.

Water pollution due to waste, dumping overflow of Adharwadi | कचऱ्यामुळे होतेय जलप्रदूषण, आधारवाडी डम्पिंग ओव्हरफ्लो

कचऱ्यामुळे होतेय जलप्रदूषण, आधारवाडी डम्पिंग ओव्हरफ्लो

Next

कल्याण : शहरातील ३५ वर्षांपासून सुरू असलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपली आहे. त्यावरील कचरा आता कल्याण खाडीच्या पाण्यात मिसळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी, आता डम्पिंगमुळे जलप्रदूषण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

केडीएमसी हद्दीतून दररोज ६४० मेट्रीक टन कचरा उचलला जातो. हा कचरा ओला व सुका, असे वर्गीकरण न करता सरसकट गोळा करून आधारवाडी डम्पिंगवर टाकला जातो. मात्र, त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जात नाही. तेथे कचºयाचा किमान २५ मीटर उंच भला मोठा डोंगर तयार झाला आहे. कचरा जास्त असल्याने डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लो झाले असून, कचरा कल्याणच्या खाडीत मिसळत आहे. त्यामुळे खाडी प्रदूषित होत आहे. प्लास्टिकच्या कच-याचेही प्रमाणही अधिक असल्याने ते खाडीच्या पाण्यात मिसळत आहे. मात्र, त्याकडे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाट नियमावलीनुसार कचरा डम्पिंग ग्राउंड हे पाणथळ जागेपासून दूर असले पाहिजे. या निकषानुसार हे डम्पिंग ग्राउंड बसत नसल्याने ते बंद करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळास गेल्या काही वर्षांपूर्वी दिले आहेत. मात्र, पर्यायी घनकचरा शास्त्रोक्त प्रक्रिया प्रकल्प अद्याप सुरू झालेले नसल्याने आधारवाडी डम्पिंगवर सुरू केलेला प्रकल्प पूर्ण क्षमतेनुसार चालविण्याऐवजी बंद करण्यात आला आहे.

महापालिकेने उंबर्डे कचरा प्रकल्प उभारला असून, तेथे कचरा प्रक्रिया सुरू केली असती, तर काही प्रमाणात आधारवाडी डम्पिंगवर पडणारा कचरा कमी झाला असता. मात्र, उंबर्डे प्रकल्पास स्थानिक शिवसेना नगरसेवक जयवंत भोईर यांनी विरोध केला. प्रकल्प बंदिस्त स्वरूपात करण्याची मागणी केली. त्यामुळे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच बंद आहे. दुसरीकडे प्रकल्प बंदिस्त स्वरूपाचा करता येत नाही, तशी तरतूदच उंबर्डे प्रकल्पात नाही, याकडे प्रशासनाने लक्ष वेधले. त्यामुळे कचरा विभागला जात नाही. प्रत्येक ठिकाणच्या कचºयावर त्या-त्या ठिकाणी प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. मात्र, अन्य ठिकाणी प्रकल्प उभारले गेलेले नाहीत.

उंबर्डे प्रकल्पाला होतोय विरोध

मुख्यमंत्र्यांसोबत ८ जुलैला झालेल्या बैठकीत त्यांनी कचरा प्रकल्पाची डेडलाइन पाळली जात नसल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पगार रोखा, असे आदेश दिले होते. त्याचबरोबर उंबर्डे प्रकल्प १५ सप्टेंबरपासून सुरू करा आणि बारावे प्रकल्प १५ मार्चला सुरू करा, अशी मुदत दिली होती.
मात्र, १५ सप्टेंबरची मुदत हुकली आहे. उंबर्डे प्रकल्प अतिवृष्टीमुळे सुरू करता आला नसल्याची सबब प्रशासनाकडून दिली गेली आहे. आता त्याला नगरसेवकाचा विरोध आहे. उंबर्डे सुरू झाला नसल्याने आधारवाडी शास्त्रोक्तरीत्या बंद होऊ शकत नाही. परिणामी, कचºयाचा डोंगर वाढतच आहे.

२० लाख घनमीटर मेट्रीक टन कचरा

आधारवाडी डम्पिंगची क्षमता किती आहे, असा सवाल घनकचरा व्यवस्थापनास विचारला असता हे डम्पिंग ग्राउंड हे डिझाइन डम्पिंग नाही. त्यामुळे त्याची क्षमता किती व काय असू शकते, हे सांगता येत नाही. २०१५ मध्ये आधारवाडी डम्पिंगवर १५ लाख घनमीटर मेट्रीक टन कच-याचा डोंगर होता. आज त्यात वाढ होऊन त्याठिकाणचा कचरा २० लाख घनमीटर मेट्रीक टन इतका झाला आहे.
एमएमआरडीएने केडीएमसी हद्दीतील रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. दुर्गाडी ते टिटवाळादरम्यान काम सुरू असले तरी या कामाला आधारवाडी डम्पिंगच्या कचºयाच्या डोंगराचा अडसर आले. हा डोंगर दूर करण्यासाठी नुकतीच तीन दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. त्यावेळी कचरा दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे कचरा पांगून तो खाडीत गेला असावा, अशी सबब घनकचरा विभागाकडून दिली जात आहे.

Web Title: Water pollution due to waste, dumping overflow of Adharwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.