शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

आसनगावच्या नागरिकांना चार ते आठ दिवसांनी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:56 IST

संतापाची लाट : प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे उद्रेक होण्याची शक्यता

आसनगाव : आसनगाव ग्रामपंचायत क्षेत्रात भीषण पाणीसमस्या निर्माण झाली आहे. दररोज होणारा पाणीपुरवठा आता चार ते आठ दिवसांनी होतो आहे. त्यामुळ आसनगावच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट आली आहे. विशेषत: महिलांमध्ये संताप असून याचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

शहापूर तालुक्यातील आसनगाव इंडस्ट्रिअल झोन असल्याने अनेक कंपन्या येथे आहेत. तसेच या परिसरात विकासकांकडून मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी केली जात आहेत. आसनगाव हे रेल्वेस्थानक मुंबईला लागून असल्याने येथे लोकसंख्येत झपाट्याने वाढ होते आहे. या वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे पाणी देण्यास आसनगावचे प्रशासन असमर्थ असल्याचे दिसते आहे.

आसनगाव शहरात सावरोली-आसनगाव, तासपाडा, आणि निर्मलनगर, कोंडेपाडा या तीन पाणीपुरवठा योजनेतून पुरवठा केला जातो. यात सावरोली-आसनगाव ही १० इंच व्यासाची, सहा लाख ९० हजार क्षमतेची फिल्टर पाणीपुरवठा योजना असून यातून गावपट्टा (जुने गाव), संभाजीनगर, शिवांजलीनगर, गावदेवीनगर, कातकरीवाडी, तुळजाईनगर, दिघेनगर, ठक्कर कम्पाउंड, ग्रीन व्ह्यू पार्क बिल्डिंग, विहिरीचापाडा, सावंत पार्क, नरेन मोनिषा अपार्टमेंट, तुलसी विहार, पंचशीलनगर, उमवणेपाडा, दत्तगुरूनगर, सावरोली, पळसपाडा, शिवाजीनगर, मुंढेवाडी, साई मंदिर, आदर्शनगर येथे पाणीपुरवठा केला जातो. तासपाडा ही तीन इंच व्यासाची, ६० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असून यातून तासपाडा, शिऱ्याचापाडा आणि रोज गार्डन तर निर्मलनगर, कोंडेपाडा ही तीन इंच व्यासाची, ४० हजार लीटर क्षमतेची पाणीपुरवठा योजना असून यातून निर्मलनगर, गोकुळसृष्टी, संघवी पॅरेडाइज येथे चार ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. अनियमित पाणीपुरवठ्याने महिला संतप्त आहेत.

पाणीपुरवठा योजना २५ वर्षांपूर्वीचीउपलब्ध पाणीपुरवठा योजना या २०११ च्या जनगणनेनुसार १३ हजार १०४ लोकसंख्येसाठी ठीक होत्या, परंतु आताची लोकसंख्या ही ३० हजारांपेक्षा जास्त असल्याने, तसेच देखभाल दुरुस्ती वेळेवर न झाल्याने, २५ वर्षांपूर्वीची ही पाणीपुरवठा योजना जीर्ण झाली आहे. इतरही पाणीपुरवठा योजना दहा वर्षे जुन्या झाल्याने सततची दुरु स्ती, मध्येच वीजपुरवठा कमीजास्त होणे, मोटारी जळणे, नदीतील पाण्याची पातळी कमी होणे आदी कारणांमुळे पाण्याची समस्या भेडसावते आहे.

ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी पाच कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर असून तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे पाठवली आहे. या मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू होईल. - जालिंदर तळपाडे (सरपंच ग्रामपंचायत आसनगाव)

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी २१ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक घेऊन काही निर्णय सर्वानुमते घेण्यात आले असून समस्यामुक्त होण्यासाठी आमचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. - बी.बी. पाटील, (ग्रामविकास अधिकारी)

टॅग्स :water shortageपाणीटंचाई