शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी शहरांसाठी, पण बळी आदिवासींचा? काळू धरणाविरोधात पुन्हा पेटला जनआंदोलनाचा एल्गार!

By सुरेश लोखंडे | Updated: February 16, 2026 17:40 IST

“आमचे अस्तित्व वाचवा” अशी आर्त हाक आज पुन्हा बुलंद झाली आहे.            

ठाणे: जमीन, जंगल आणि जगण्याच्या हक्कासाठी आदिवासी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. काळू धरणामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या १९ गावांचा संताप आता उफाळून आला आहे. सरकारी दडपशाहीविरोधात मुरबाडच्या मातीतून संघर्षाचा आवाज घुमतो आहे. “आमचे अस्तित्व वाचवा” अशी आर्त हाक आज पुन्हा बुलंद झाली आहे.            

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर प्रस्तावित असलेल्या धरणाविरोधात पुन्हा एकदा जनआंदोलन उभे राहिले आहे. मौजे चासोळे येथे रविवारी पार पडलेल्या एल्गार मेळाव्यात धरणग्रस्त १९ गावांतील नागरिकांनी एकमुखाने सरकारच्या निर्णयाविरोधात ठाम भूमिका घेतली. मुंबई आणि परिसरातील शहरांना पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या धरणामुळे हजारो आदिवासी कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत. मुंबई शहराच्या गरजांसाठी ग्रामीण भागाचे बलिदान का, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

काळू धरण विरोधी संघर्ष समितीचे पोपटराव देशमुख आणि विनोद राऊत यांनी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. मार्गदर्शन करताना इंदवी तुळपुळे म्हणाल्या, “३४ अटींची पूर्तता न करता केवळ धनदांडग्यांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प रेटला जात आहे. गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उतरून लढा देऊ.” शाई धरण विरोधी संघर्ष समितीचे ॲड. प्रशांत सरखोत यांनी जल, जंगल आणि जमीन वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. “हा केवळ धरणाचा प्रश्न नाही, तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे,” असे ते म्हणाले.

या धरणविरोधी वारंवार ठराव होऊनही शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन यावेळी गांवकऱ्यांनी केले. सामूहिक वनहक्क दावे प्रलंबित असताना धरणाचा अट्टाहास का, असा सवालही उपस्थित झाला. या मेळाव्यात जेष्ठ कार्यकर्ते हरिभाऊ राऊत, विलासकाका देशमुख, नंदू राऊत, किसन आलम, अरुण राऊत, दशरथ देशमुख, शकील शेख यांच्यासह अनेकांनी भावना व्यक्त केल्या. “कोणत्याही परिस्थितीत धरण होऊ देणार नाही,” असा एकमुखी ठराव उपस्थितांनी हात उंचावून मंजूर केला.

आज काळू धरणग्रस्तांचा हा लढा केवळ पाण्याविरोधात नाही, तर अन्याय, विस्थापन आणि दडपशाहीविरोधात आहे. सरकारने वेळीच जनतेचा आवाज ऐकला नाही, तर हा संघर्ष आणखी तीव्र होईल, हे मात्र नक्की.

English
हिंदी सारांश
Web Title : Kalu Dam: Tribal anger flares against displacement for city water.

Web Summary : Tribals protest Kalu Dam in Murbaad, fearing displacement of 19 villages for Mumbai's water supply. They demand protection of their rights and oppose the project, citing unmet conditions and disregard for tribal welfare. Villagers vow to resist the dam construction.
टॅग्स :thaneठाणे