शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या शहरी भागातही पाणीकपात, १० तारखेनंतर होणार कपात; कळवा, मुंब्य्रात कपातीस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 06:33 IST

उन्हाळ्यापूर्वीच ठाण्यावर पाणीकपातीचे संकट घोंघावण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, शुक्रवारपासून दर १५ दिवसांनी शहरातील कळवा आणि मुंब्रा भागांतील पाणीपुरवठा २४ तास बंद ठेवण्यास सुरुवात झाली आहे.

ठाणे  -  उन्हाळ्यापूर्वीच ठाण्यावर पाणीकपातीचे संकट घोंघावण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, शुक्रवारपासून दर १५ दिवसांनी शहरातील कळवा आणि मुंब्रा भागांतील पाणीपुरवठा २४ तास बंद ठेवण्यास सुरुवात झाली आहे. पाणीकपातीची पहिली कुºहाड एमआयडीसीने उगारल्यानंतर आता १० तारखेनंतर स्टेमदेखील कपातीचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे शहरी भागालाही पाणीकपातीच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी कळवल्याने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्र वार, ५ जानेवारीपासून दर १५ दिवसांनी म्हणजेच गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या कालावधीत कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुमपाडा क्र .१ येथे एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा २४ तास पूर्ण बंद राहणार आहे. या शटडाउनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळणार असून नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.पुढील आठवड्यापासून ठाणे शहरालादेखील पाणीकपातीचा सामना करावा लागणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया स्टेमनेदेखील १० जानेवारीनंतर पाणीकपात लागू करण्याचे निश्चित केल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.10तारखेनंतर शहरी भागात कपात सुरू होईल. स्टेमने जरी पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी शहरी भागांना ३७० पैकी केवळ ११० एमएलडी पाणी कमी होणार आहे. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम ठाणेकरांना जाणवणार नाही.

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे