शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! ठाण्याची पाणी कपात रद्द,  मुंबई महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा होणार पूर्ववत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 20:50 IST

यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्‍यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता . त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात फक्त 34 टक्के पाण्याचा साठा उपलब्ध होता

ठाणे -  गेल्या आठवड्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आता ठाण्यावर निर्माण झालेले पाणी कापतीचे संकट टळले आहे . त्यामुळे गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी ठाण्याच्या काही भागात झालेली पाणी कपात रद्द होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली असून मुंबई महापालिकेकडून एकूण होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्यात आलेले १३ एमएलडी पाणी पुन्हा मिळणार असून ठाण्याचा पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्‍यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता . त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात फक्त 34 टक्के पाण्याचा साठा उपलब्ध होता परिणामी भविष्यातील गरज ओळखून मुबई महापालिकेने २० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता.  या कपातीमुळे ठाण्यातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्यास सुरुवात झाली होती. मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेला  दररोज ६५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र मुंबई महापालिकेनेच  त्यांच्या क्षेत्रात २० टक्के पाणी कपात केली असल्याने ठाण्याला मुंबई महापालिकेकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये १३ टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. त्यामुळे  ठाण्याला ५ ऑगस्ट पासून केवळ ५२ एमएलडीच पाणी पुरवठा होता. 

 गेल्या दीड आठवड्यपासून धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आता पाणी कपातीचे संकट दूर झाले असून  गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी  पाणी कपात रद्द होणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ठाणेकरांना मात्र उत्सवाच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे.  ठाण्यातील या भागात होणार पाणी पुरवठा पूर्ववत ...  मुंबई महापालिकेकडून ठाण्याला दररोज ६५  एमएलडी पाणीपुरवठा होत असला तरी,शहरातील मोजक्या भागांना हा पाणी पुरवठा होत असून यामध्ये नौपाडा, कोपरी, पाचपाखाडी, गावंदेवी, जांभळी नाका,खारकर आळी, स्टेशन रोड,लुईसवाडी, अंबिका नगर, हाजुरी,या भागांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतल्यानंतर  या सर्व भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. मात्र आता हा पाणीपुरवठा पुन्हा पूर्ववत होणार आहे. 

" पूर्वी धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने मुंबई महापालिकेने पाणी कपात केल्याने ठाण्याला १३ एमएलडी कमी पाणी मिळत असल्याने अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु होता.आता धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी पत्र देण्यात आले असून त्यांनी ते मान्य केले आहे. परिणामी आता ठाणे महापालिका हद्दीत पाणी कपात नाही."                                   - विनोद पवार , उपनगर अभियंता , पाणी पुरवठा विभाग, ठा.म.पा                               

टॅग्स :WaterपाणीMumbaiमुंबईthaneठाणे