ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर शहरांमध्ये पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:30 AM2021-01-03T01:30:18+5:302021-01-03T01:30:44+5:30

स्टेम प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी शहाड येथे फुटली : दुरुस्तीस लागणार १४ तास लोकमत न्यूज नेटवर्क 

Water cut in Thane, Bhiwandi, Mira Bhayandar cities | ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर शहरांमध्ये पाणीकपात

ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर शहरांमध्ये पाणीकपात

Next

ठाणे : ठाणे शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठा करणारी स्टेमची मुख्य जलवाहिनी शहाड मुख्य हेडक्वॉर्टरजवळ फुटल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर, सकाळी ती फुटली. नदीपात्रात ती भूमिगत असल्याने तिच्या दुरुस्तीसाठी १२ ते १४ तास लागणार असल्याची महापालिकेने दिली.


       १८५० व्यासाच्या या जलवाहिनीतून ११६ दशलक्ष पाणीपुरवठा रोज होत आहे. त्यामुळे संपूर्ण ठाण्यासह मीरा-भाईंदर, भिवंडी शहरावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कमी दाबाने पाणी येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
    स्टेमच्या या जलवाहिनीचा वीजपुरवठा रात्री खंडित झाला होता. त्यानंतर, सकाळी ती एका ठिकाणी लिकेज झाली, तर अन्य एका ठिकाणी फुटली. सहा तासांत ३ वेळा वीज खंडित झाल्याने त्याचा परिणाम या जुन्या आणि ३० वर्षे जीर्ण झालेल्या जलवाहिनीवर झाला. ती ज्या ठिकाणी फुटली आहे, ती जागा नदीजवळ खाली असल्याने, दुरुस्तीसाठी स्टेम प्राधिकरणाला १२ ते १४ तास लागणार आहेत. 


   या संदर्भात महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, रात्री १२ नंतरच ती दुरुस्त होऊ शकणार आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे.

‘स्टेम’चा येथे होतो पाणीपुरवठा
स्टेम प्राधिकरणाच्या या जलवाहिनीतून ठाणे शहरासह मीरा-भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिका आणि भिवंडी ग्रामीण भागालाही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागांचाही पाणीपुरवठा बंद केला आहे. 
स्वत:ची पाणीपुरवठा योजना असल्याने, त्याचा जास्तीचा परिणाम ठाणे शहरावर होणार नसला, तरी मीरा-भाईंदर आणि भिवंडीला पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. 
दरम्यान, पाण्याअभावी तेथील नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे.

ठाणे शहरात झोननिहाय नियोजन; ठिकठिकाणी चार तास पुुरवठा राहणार बंद 
n ठाणे शहराला या जलवाहिनीतून ११६ दशलक्ष लीटर रोज पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला पाणीकपातीची झळ बसण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २१० दशलक्ष लीटर पाण्याचे झोननिहाय नियोजन करण्यात येणार आहे. 
n त्यानुसार, घोडबंदरचा पाणीपुरवठा चार तास बंद ठेवला जाणार आहे. त्यानंतर ठाणे शहराचा चार तास त्यानंतर उर्वरीत भागात चार तास पाणीपुरवठा बंद ठेवून कोणत्याही भागाला पाण्यापासून वंचित न ठेवता कमी दाबाने तो केला जाणार आहे.
n यामुळे ठाणेकरांनी पाण्याचा अतिवापर न करता, जोपर्यंत जलवाहिनी दुरुस्त होत नाही, तोपर्यंत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Water cut in Thane, Bhiwandi, Mira Bhayandar cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.