शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

कोरोनापेक्षा आमच्या गावात पाणीटंचाईचे संकट मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:10 IST

दूधगाववासीयांचा घोटभर पाण्यासाठी आटापिटा

- रवींद्र साळवेमोखाडा :  राज्यासह जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे, मात्र जिल्ह्यातील काही गावे तहानेने व्याकूळ झालेली असून त्यांना कोरोनापेक्षा पाणीटंचाईचे संकट मोठे वाटत आहे. घोटभर पाण्यासाठी अनेक गावांचा आटापिटा चाललेला आहे. मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करताना दिसत आहेत. तालुक्याच्या मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर वसलेल्या गोमघर ग्रामपंचायतमधील सुमारे १०० कुटुंबांच्या लोकवस्तीचे दुधगाव मार्चच्या सुरुवातीपासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे.दुधगावमधील पाणीटंचाईची समस्या आता उग्र बनली असून महिनाभरापूर्वीच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे, परंतु अद्यापही टँकर उपलब्ध करून दिले नसल्याने स्थानिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परिणामी घोटभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून रात्री-अपरात्री महिला-पुरुष लहानग्यांना विहिरीत उतरून पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. प्रशासनाने वेळेत टँकरने पाणी पुरवले नाही तर आमच्याकडे कोरोनाने नव्हे तर पाणीटंचाईचे बळी जातील. याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल येथील युवकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.या परिसरातील आदिवासींना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावापासून १ ते २ कि.मी. डोंगर उतारावर एकमेव असलेल्या विहिरीतील पाणी फेब्रुवारीच्या अखेर संपुष्टात येते. तेव्हापासून येथील आदिवासीना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. दरम्यान, टँकरबाबत मोखाडा तालुक्याचे तहसीलदार वैभव पवार यांना विचारले असता याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे त्यांनी सांगितले.बंधाऱ्यांमध्ये पाणीच नाही येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्चून तीन बंधारे बांधले आहेत, परंतु त्यामध्ये थेंबभरही पाणी नसल्याने काहीच फायदा झालेला नाही.सर्वत्र कोरोनाचे मोठं संकट निर्माण झाले असताना आमच्याकडे मात्र त्यापेक्षाही मोठं संकट पाणीटंचाईचे आहे. आमच्या महिला रात्रीच्या वेळेत लहान मुलांना घेऊन विहिरीवर पाणी भरण्यासाठी जातात. यावेळी एखादी दुर्घटना उद्भवल्या त्याला जबाबदारी कोण?- सोमा वारे, स्थानिक आदिवासी युवा कार्यकर्ता

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई