शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

जिल्ह्यातील वाढीव पाणीकपातीचे संकट टळले; कपातही कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 00:25 IST

धरणांच्या पाणीसाठ्यातील २२ टक्के तूट भरून काढण्यासह जादा पाणी रोखण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून २२ टक्के पाणीकपात लागू आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे : धरणांच्या पाणीसाठ्यातील २२ टक्के तूट भरून काढण्यासह जादा पाणी रोखण्यासाठी जिल्ह्यात आठवड्यातून २२ टक्के पाणीकपात लागू आहे. यासाठी ३० तास पाणीपुरवठा सक्तीने बंद ठेवला जातो. २२ ऑक्टोबरपासून या सक्तीच्या कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या पाणीकपातीत उन्हाळ्यात वाढ होण्याऐवजी ती कमी करण्याच्या हालचाली जोर धरू लागल्या आहेत.उन्हाळ्यात नागरिकांना वाढीव पाणीकपातीला सामोरे जावे लागणार असल्याची जिल्ह्यात चर्चा होती; मात्र प्रत्यक्षात या वाढीव कपातीपासून सुटका होण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेली दीड दिवसाची २२ टक्के पाणीकपात या महिनाअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमी करण्याचे संकेत मिळाले आहेत; मात्र २० मार्च रोजी असलेल्या होळीला पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यानंतर, पाणीसाठ्याचा आढावा घेऊन महापालिका, नगरपालिकांमधील जीवघेणी पाणीकपात कमी किंवा रद्द होण्याचे संकेत आहेत.महापालिका, नगरपालिकांना नियमानुसार सुमारे एक हजार १९२ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे; मात्र या मंजूर पाणीकोट्यापेक्षा रोज सुमारे एक हजार ५२१ एमएलडी पाणी उचलले जात आहे. सुमारे ३२९ एमएलडी जादा पाण्याची चोरी होत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला. यामुळे आॅक्टोबरपासून नागरिकांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. सक्तीची पाणीकपात व पाणीचोरी बंद करण्यासाठी सक्तीच्या उपाययोजना हाती घ्याव्या लागल्या. त्यामुळे मंजूर पाणीकोट्यातून आठवडाभर सुमारे २६२.२४ एमएलडी पाण्याची बचत झाली. याशिवाय, रोज होणारी ३०० एमएलडीपेक्षा जास्त पाण्याची चोरी थांबली. त्यामुळे सद्य:स्थितीला बारवीसह आंध्रा धरणात मुबलक पाणीसाठा असल्याची नोंद लघुपाटबंधारे विभागाने घेतली आहे.मंजूर पाणीकोट्यापेक्षा रोज मनमानी पाणी उचलल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा एक महिना आधीच जादा पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. मंजूर पाणीकोट्यापेक्षा एमआयडीसीच्या सुमारे २०० एमएलडी व कल्याण-डोेंबिवली महापालिका (केडीएमसी)सुमारे ६६ एमएलडी जादा पाणी उचलण्यास आळा घालण्यात आला आहे.>जादा पाणी उचलण्यास आळाएमआयडीसी ५८३ एमएलडी या दैनंदिन मंजूर पाणीपुरवठ्यापेक्षा ७५० ते ८०० एमएलडी, तर केडीएमसी त्यांच्या २३४ एमएलडी या मंजूर कोट्यापेक्षा सुमारे ३०० एमएलडी पाणी जास्त उचलत असल्याची नोंद करण्यात आली होती. या खालोखाल एमजेपी त्यांच्या ९० एमएलडीपेक्षा जास्त व टेमघरने २८५ एमएलडी या मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी उचलले होते.>मुबलक पाणीपुरवठायंदा २२ टक्के पाणीकपातीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागले. ती आता लवकरच कमी होणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा-भार्इंदर, भिवंडी महापालिका आदी ठिकाणी उन्हाळ्यात मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.

टॅग्स :Waterपाणी