शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कसाऱ्यात आठवड्यातून एकदाच येते पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 02:28 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या या पाणीयोजनेतून आठवड्यातील एकच दिवस ग्रामस्थांसाठी पाणी मिळत आहे.

शहापूर : आगामी १० वर्षांचा कालावधी डोळ्यांसमोर ठेवत, सुमारे ३६ हजार लोकसंख्येला पाणी पुरेल, असा विचार करून कसारावासीयांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल आणि पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर होईल, या अपेक्षेने सुरू करण्यात आलेल्या पाणीयोजनेचे लवकरच तीनतेरा वाजणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या या पाणीयोजनेतून आठवड्यातील एकच दिवस ग्रामस्थांसाठी पाणी मिळत आहे.यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे अभियंता वसंत आल्हाट यांना विचारले असता, ते म्हणाले की, ही योजना पूर्ण होऊन नियोजनासाठी मोखावणे ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आली आहे. पाण्याची उपलब्धता पाहूनच ग्रामपंचायतीकडून पाण्याचे वाटप केले जाते. त्यामुळे धरणात जितका पाण्याचा साठा असेल, त्यानुसार नियोजन करावे लागते.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या योजनेत कसाºयातील धरणाची उंची वाढवण्यासह जलशुद्धीकरण केंद्र, पाच लाख १० हजार ली. क्षमतेचा भूस्तर जलकुंभ आणि चार लाख २१ हजार लीटर क्षमतेची उंच टाकी, पाण्याची पंपिंग मशिनरी, ऊर्ध्ववाहिनी, वितरणव्यवस्था आदींचा समावेश आहे. २०१८ मध्ये ही योजना सुरू होणार होती. परंतु, ढिसाळ कारभारामुळे योजना सुरू होण्यास २०१९ साल उजाडावे लागले. अखेर, १६ मार्च २०१९ रोजी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू झाली. मात्र, आठवड्यातून एकच दिवस येथील ग्रामस्थांना या योजनेचे पाणी मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आठवडाभराचा पाणीसाठा एकदाच करून ठेवतात.गेल्या वर्षीचे पावसाचे कमी असलेले प्रमाण, कसाºयाची भौगोलिक रचना समतल नसणे, नागमोडी पाइपलाइन असल्याने पुरेसे पाणी सोडता येत नसल्याचे कारण अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते.आज मुंबई असे किंवा अन्य शहरांत काही ठिकाणी मुबलक पाणी तर काही भागात जेमतेम पुरवठा होत आहे. शहरी भागाला अद्याप टंचाईचे चटके जाणवत नसले तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज परिस्थिती गंभीर होत चालली आहे.सरकार, संबंधित यंत्रणांनी वेळेतच पावले उचालायली हवीत. दरवर्षी टंचाई जाणवत हे माहित असूनही कार्यवाही का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आराखडे केवळ केले जातात, मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाही.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई