शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात दोन वेगवेगळ्या वेळी पाणी बंद, अंबरनाथमध्ये शिवसेनेचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 03:24 IST

अंबरनाथ शहरात दोन महिन्यांपासून होणारी पाणीटंचाई ही त्रासदायक ठरत असतानाही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात दोन महिन्यांपासून होणारी पाणीटंचाई ही त्रासदायक ठरत असतानाही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जीवन प्राधिकरणाविरोधात अंबरनाथ शिवसेनेच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सरसकट दोन दिवस बंद न घेता २४-२४ तासांचे दोन बंद आठवडाभरात घेण्याची मागणी करण्यात आली. शिवसेनेची ही मागणी लागलीच मान्य करण्यात आली. या मोर्चाला उत्तर देण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी हजर राहावे, अशी मोर्चेकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, ते उपस्थित न राहिल्याने कार्यालयात तणावाचे वातावरण होते.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्या मनीषा पलांडे (प्रभारी) यांच्या अखत्यारीत अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील पाणीपुरवठा योजना आहे. मात्र, अधिकाºयांच्या चुकीचा भुर्दंड हा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो आहे. वितरणव्यवस्थेतील त्रुटी, पाण्याची गळती, दूषित पाणीपुरवठा या मुख्य समस्यांवर अनेकदा चर्चा करूनही त्यावर कोणतेच ठोस निर्णय अधिकाºयांमार्फत घेण्यात आलेले नाहीत. शहरात पाणीसमस्या त्रासदायक असतानाही अधिकारी नियोजनाकडे दुर्लक्ष करत असल्याने शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शिवाजी चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या मोर्चात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा शांतताभंग करेल, या भीतीने पोलिसांनी संपूर्ण कार्यालयाला बंदोबस्त दिला होता. मोर्चेकºयांच्या वतीने अरविंद वाळेकर, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, चंद्रकांत बोराडे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाºयांसोबत चर्चा करण्यात येणार होती. मात्र, प्राधिकरणाच्या मनीषा पलांडे या अंबरनाथला न आल्याने वाळेकर यांनी संताप व्यक्त केला. पलांडे यांना पूर्वकल्पना देऊनही अधिकारी येत नसतील, तर पाणीप्रश्नावर ते गंभीर नाहीत, असेच दिसत असल्याचा आरोप वाळेकर यांनी केला. जोपर्यंत ते येत नाही, तोवर मोर्चा हलणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली. अखेर, सहा. पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी तडजोड करून चर्चा करण्यास भाग पाडले.शासनाच्या आदेशाप्रमाणे ३७ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, वितरणव्यवस्था सुरळीत करण्यासाठी तीन दिवस पाणी बंद आहे. प्राधिकरणाच्या चुकीच्या नियोजनामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्राधिकरणाने तसेच शहरात होणारा दूषित पाणीपुरवठा बंद करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यासही मंजुरी देण्यात आली. या दोन मुख्य मागण्यांवर प्राधिकरणाने लेखी आश्वासन दिल्यावर हा मोर्चा माघारी निघाला. 

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे