शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या मेहनतीवर केंद्राचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:38 IST

जलवाहतूक एमएमबीकडे : पहिल्या टप्प्यात ५० किमीचा जलमार्ग

अजित मांडके ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जलवाहतुकीला चालना दिली जात होती. मागील दोन वर्षांपासून जलवाहतुकीचे गुºहाळ सुरू आहे. यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिश्रम घेऊन जलवाहतुकीचे स्वप्न साकारण्यासाठी पावले उचलली होती. मात्र, त्यांच्या स्वप्नांना केंद्राने फुली मारली आहे. जलवाहतुकीचे पहिल्या टप्प्यातील काम आता ठाणे महापालिका नाही, तर केंद्राने नेमलेल्या एमएमबी अर्थात महाराष्टÑ मेरीटाइम बोर्डाकडून केले जाणार आहे. महापालिकेने या प्रकल्पाचे सर्व सोपस्कार केल्यानंतर आता बोर्ड केवळ त्यावर अंमलबजावणीचे काम करणार आहे.

दोन वर्षांपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जलवाहतुकीची संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. पहिल्या टप्प्यात ठाणे, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र शासनाने केव्हाच मंजुरी दिली असून, त्याच्या उभारणीसाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. ठाणे, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या पहिल्या टप्प्यात ५० किमी लांबीचा अंतर्गत प्रकल्प राबविला जाणार आहे.ठामपाचा सल्लागारावर एक कोटींचा खर्चपहिल्या टप्प्यातील जलमार्गाची वर्षभरापूर्वीच चाचपणी करण्यात आली होती. खाडीमध्ये बोटी चालविण्यासाठी ओहोटीच्या वेळेतही खाडीमध्ये सहा ते सात मीटर पाणी शिल्लक असणे आवश्यक आहे. त्यामुळे खाडीमध्ये बोटी उतरवून त्याचीही पाहणी करण्यात आली होती. याशिवाय, खाडीमार्गात खडक आहे का, याचीही पाहणी करण्यात आली. कोणत्या भागात दगड आणि मातीचा गाळ काढावा लागेल, याचाही अभ्यास करण्यात आला होता. तसेच खाडीच्या तळाशी असलेले खडक, माती आणि गाळ यांचेही परीक्षण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यासाठी महापालिकेने सल्लागारही नेमून त्यासाठी एक कोटी सहा लाख २० हजारांचा खर्च केला आहे.मेरीटाइम बोर्डाला अहवालाची प्रतीक्षाएवढा सगळा प्रपंच केल्यानंतर आता महापालिकेचेच पंख छाटण्याचे काम केंद्रीय समितीने केले आहे. महापालिकेने या प्रकल्पाचे सर्व ताट तयार केल्यानंतर त्याची चव चाखण्याचे काम आता या समितीने मेरीटाइम बोर्डाकडे सोपविले आहे. आता मेरीटाइम बोर्ड महापालिकेने नेमलेल्या सल्लागाराकडून एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंटच्या अहवालाची वाट पाहत आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. महापालिका आता केवळ बोर्डाला या प्रकल्पाबाबत अपेक्षित असलेली माहिती देण्याचेच काम करणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका