शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कचरावेचकांच्या मुलांसाठी वेचले ज्ञानाचे कण; संगीता हेगडे यांनी ५८० मुलांना आणले शिक्षणप्रवाहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 00:35 IST

कोल्हापूर येथे शालेय शिक्षण घेतलेल्या संगीता यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्याचे पदवी शिक्षण घेतले.

जान्हवी मोर्ये

डोंबिवली : डम्पिंग ग्राउंड ही शहरीकरणाची बडी समस्या आहे. तेथे कचरावेचक महिला-पुरुष काम करतात. या कचरावेचकांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संगीता हेगडे या सात वर्षांपासून काम करत आहेत. मूव्हमेंटच्या समन्वयक म्हणून त्यांनी हे आव्हान स्वीकारले. आतापर्यंत त्यांनी कचरावेचकांच्या ५८० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. त्यापैकी काहींना उपजीविकेसाठी साधन उपलब्ध करूनही दिले आहे.

कोल्हापूर येथे शालेय शिक्षण घेतलेल्या संगीता यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्याचे पदवी शिक्षण घेतले. मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी त्यांनी काम केले आहे. २०१२ मध्ये कल्याणमध्ये ‘नवोदय’ या प्रकल्पात काम करण्यास सुरुवात केली. कचरावेचक मुलांसाठी सुरू झालेला हा प्रकल्प अधिकच आव्हानात्मक होता. त्यासाठी त्यांना १६ जणांची मदत मिळाली. कल्याण आणि भिवंडी येथील कचरावेचकांच्या मुलांसाठी त्यांनी बालवाडी सुरू केली. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड येथील साठेनगरातील ४५ मुले शाळेत येऊ लागली. या मुलांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी नवोदयने स्वीकारली. कचरावेचकासाठी बचतगट तयार करून त्यांना स्वावलंबी बनवले. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी येथील १३६ कचरावेचकांना दुसरे काम उपलब्ध करून दिले. त्यांसाठी आर्थिक साहाय्यही केले जाते.बदल घडण्यासाठी तीन वर्षे लागली; अनेक उच्चशिक्षित झाले!संगीता हेगडे म्हणाल्या की, बदल दिसून येण्यासाठी तीन वर्षे जावी लागली. उच्चशिक्षण घेतलेली मुलेही कचरावेचत होती. त्यांच्या हाताला काम दिले. नवोदय आता चळवळ झाली आहे. त्याद्वारे शिक्षणाच्या प्रवाहात आलेले काही विद्यार्थी आयआयटी झाले आहेत, तर काही पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहेत. हा बदल घडविताना खूप प्रयत्न करावे लागले.