शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; वर्गीकरण होत नसल्याने उचलण्यास उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:17 IST

प्रशासन म्हणते, कचरा वाढला

मीरा रोड : ऐन सणासुदीला शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग पडून असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तर दिवाळीत कचºयाचे वाढलेले प्रमाण तसेच कचºयाचे वर्गीकरण करून नागरिक देत नसल्याने कचरा उचलला गेला नसल्याचा दावा प्रशासन करत आहे.मीरा- भाईंदरमध्ये दिवाळीच्या सणादरम्यान ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचून असल्याचे दिसत आहे. कचºयाचे ढीग पडून असल्याने दुर्गंधी पसरून त्यावर घुशी, भटकी जनावरे आदींचे प्रमाण वाढत आहे. भर रस्ता वा नाक्यावर साचलेल्या कचºयाच्या ढीगांमुळे नागरिकांना चालणे जिकरीचे झाले आहे.

सणाच्यावेळी तरी शहरात स्वच्छता असायला हवी होती. मात्र महापालिका डोळेझाक करत असल्याने शहरात कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. महापालिका मात्र दिवाळीत कचºयाचे प्रमाण वाढल्याने हा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत आहे. उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे म्हणाले की, एरव्ही ५०० टन रोज निघणारा कचरा दिवाळी सणात ६०० टनावर गेला आहे.

१०० टनाने कचरा वाढल्याने सफाई कामगार आणि वाहन व्यवस्था अपुरी पडत असल्याचे मुख्य कारण आहे. शिवाय सुट्टीनिमित्त कामगारांच्या रजांचा परिणाम कामावर झाला आहे. ओला व सुका कचरा वेगळा करून देणे कायद्याने बंधनकारक असतानाही काही गृहनिर्माण संस्था व नागरिकांकडून कचरा वेगळा करून दिला जात नसल्याने त्यांचा कचरा न उचलण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचेही कारण शहरात कचरा साचण्यामागे असल्याचे ते म्हणाले.

नागरीकांमधून मात्र महापालिकेचा हा खोटारडेपणा असून शहरातील कचरा त्वरित उचलून त्याची विल्हेवाट लावण्याची तातडीची गरज असल्याचे म्हटले जात आहे. कचरा वर्गीकरण स्वत: पालिका आणि लोकप्रतिनिधीही करत नाहीत. कंत्राटी कामगारांची संख्या कमी असून आहेत ते प्रामाणिकपणे काम करत नसल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक