शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
5
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
6
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
7
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
8
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
9
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
10
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
11
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
12
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
13
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
14
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
15
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
16
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
17
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
18
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
19
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
20
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा

भाजीविक्रीच्या गाड्या धुळखात

By admin | Updated: December 8, 2015 01:29 IST

घोटाळ्यांच्या आरोपामुळे गाजत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना भाजीपाला वाहतुकीकरिता गाड्या पुरवण्याचा निर्णय घेतला होता.

अजित मांडके,  ठाणेघोटाळ्यांच्या आरोपामुळे गाजत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाने मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना भाजीपाला वाहतुकीकरिता गाड्या पुरवण्याचा निर्णय घेतला होता. अशा १०० पैकी ५९ गाड्या टिकुजिनीवाडी येथील कंपनीत दोन वर्षांपासून धूळ खात पडल्या आहेत. शासनाने या गाड्यांचे वाटप करण्यास हिरवा झेंडा दाखवला असला, तरी घोटाळ्यांच्या आरोपांमुळे लाभार्थ्यांनीच त्याकडे पाठ फिरविली आहे. महामंडळ गाड्या घेत नाही, म्हणून सध्या ज्या कंपनीच्या आवारात गाड्या धूळ खात पडून आहेत, त्या कंपनीने पार्किंगचे दीड वर्षाचे सुमारे ८४ लाखांचे बिलही महामंडळाला पाठविले आहे. आता हा आणखी एक भुर्दंड महामंडळाच्या माथ्यावर पडणार आहे. मागासवर्गीय बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली महामंडळाने २०१३ मध्ये १०० गाड्या खरेदी केल्या. यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. मागील दोन वर्षांपूर्वीच या गाड्या तयार झाल्या असून, सुरुवातीला महामंडळाचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र लावून गाडीचे डिझाइन तयार करण्यात आले. नंतर कदम यांना जेलयात्रा घडल्यावर भाजीपाल्याचेच चित्र ठेवण्यात आले. आजतागायत या गाड्या महामंडळाने ताब्यात घेतलेल्या नाहीत.बाजारमूल्य दोन लाखांनी झाले कमीमहामंडळाला सध्या अध्यक्ष नसल्याने निर्णय प्रक्रिया ठप्प आहे, तसेच गेली दोन वर्षे पडून असल्याने, त्या गाड्यांचे बाजारमूल्यही कमी झाले आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, या गाड्यांचे बाजारमूल्य पूर्वी ७ लाख ३१ हजार होते. परंतु आता त्याचे मूल्य रजिस्ट्रेशन आणि विमा पकडून ५ लाख ८१ हजार ९२३ एवढे झाले आहे. लाभार्थ्यांना गाड्यांचा ताबा हवा असेल तर त्यासाठी २९ हजार ९६ रुपये भरावे लागतील. लाभार्थ्यांकडून प्रतिसाद नाहीपडून असलेल्या गाड्या लाभार्थ्यांना देण्याकरिता यंदा प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जाहिराती काढण्यात आल्या होत्या. त्यांना फारसा प्रतिसादच मिळाला नसल्याचा दावा आता महामंडळाने केला आहे. केवळ लातूर, अमरावती, पुणे आणि ठाण्यातून प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. ठाण्यातील अर्जांची छाननी अद्याप झाली नाही. इतर ठिकाणी पुन्हा या जाहिराती दिल्या जाणार असल्याचेही महामंडळाने सांगितले. त्यानंतर पुढील धोरण निश्चित केले जाईल, असेही स्पष्ट केले आहे.सात जणांची वर्कआॅर्डर काढली...महामंडळाने उशिराने का होईना, परंतु सात जणांची वर्कआॅर्डर काढली असून, यामध्ये नाशिक १ आणि मुंबई उपनगर ६ अशा सात जणांचा समावेश आहे, परंतु महामंडळातील घोटाळा उघडकीस आल्याने, आता राज्य शासनाने या लाभार्थ्यांची वर्कआॅर्डर ही बोर्डाच्या पटलावर ठेवून मंजूर करून घ्यावी. त्यानंतर ती लाभार्थ्यांसाठी सादर करून त्याचे वाटप करण्यात यावे, अशा सूचना केल्या आहेत, परंतु ही बैठक केव्हा होणार, याचेही उत्तर महामंडळाकडे नाही. आधीच घोटाळ्याने महामंडळ गोत्यात आले असताना, आता दोन वर्षांपासून गाड्या महामंडळाने ताब्यात न घेतल्याने, आता संबंधित कंपनीचालकांनी रोज २०० रुपये या प्रमाणे पार्किंगचे आतापर्यंतचे सुमारे ८४ लाखांचे बिल मागितले आहे. विशेष म्हणजे, ज्या वेळेस अटीशर्तींची निश्चिती करण्यात आली, त्या वेळेस ही अट त्यात नव्हती, परंतु महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे महामंडळाला आता आणखी ८४ लाखांची फोडणी बसणार आहे. गाड्यांचे पैसेही कंपनीला झाले अदा : गाड्या खरेदी करण्याचे काम ज्या कंपनीला देण्यात आले होते, त्यांना या कामाचे पैसेही सुमारे दीड वर्षापूर्वीच अदा झाले असून, केवळ गाड्या ताब्यात घेण्यापूर्वी शिल्लक राहिलेली किरकोळ रक्कम अदा केली जाणार आहे.महामंडळाला भुर्दंड : घोटाळ्यांच्या आरोपांमुळे लाभार्थ्यांनीच त्याकडे पाठ फिरविली आहे. महामंडळ गाड्या घेत नाही, म्हणून सध्या ज्या कंपनीच्या आवारात गाड्या धूळ खात पडून आहेत, त्या कंपनीने पार्किंगचे दीड वर्षाचे सुमारे ८४ लाखांचे बिलही महामंडळाला पाठविले आहे.