शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वारकऱ्यांसाठी बांधण्यात आलेले वारकरी भवन तब्बल ८ वर्षानंतर मिळाले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 4:30 PM

वारकरी भवन परत मिळावे यासाठी आज दुपारी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची लोकसभा खासदार राजन विचारेंसोबत सर्व वारकरी, ज्येष्ठ नागरिक आणि नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. 

ठळक मुद्देवारकरी भवन तब्बल ८ वर्षानंतर मिळाले परत महापालिका आयुक्तांनी दिले अधिकृत वाटप पत्र न्यायालयाकडून मिळाल्यानंतर ती इमारत संबंधितांना करणार परत - आयुक्त

ठाणे : वारकऱ्यांसाठी बांधण्यात आलेले वारकरी भवन आज तब्बल ८ वर्षानंतर खासदार राजन विचारेंच्या प्रयत्नांमुळे जेष्ठ नागरिक, वारकरी मंडळ, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कलावंतांना परत मिळाले. आज महापालिका आयुक्तांनी त्यांना अधिकृत वाटप पत्र दिले. 

वारकरी भवनाचे भूमिपूजन २००७ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. ही वास्तू २०१० साली बनून तयार झाली. ह्या वास्तूचे लोकार्पण २०११ साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. तरीही सदर वास्तू वारकरी संप्रदायाच्या लोकांना हस्थांतरित केलेली नव्हती. त्या नंतर २०१६ साली महानगरपालिकेने एक ठराव पास केला होता त्यात स्पष्ट उल्लेख केलेला की सदर वस्तूचा पाहिला मजला ज्येष्ठ नागरिकांसाठी, दुसरा मजला संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज वारकरी संघ यांच्यासाठी व तिसरा मजला अखिल भारतीय नाट्य संमेलन ठाणे शाखेसाठी राखीव ठेवण्यात आलेला होता. ठराव संमत होऊनही सदर लोकांना त्या वास्तूचा ताबा दिला गेला नाही. त्या ठरावालाही आज २ वर्ष पूर्ण झाले आहेत. २०१७ साली ठाणे  जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत धोकादायक झाल्या कारणास्तव वारकरी भवनाची ईमारत ५-६ महिन्यांसाठी ठाणे  जिल्हा सत्र न्यायालयाने वापरण्यास मिळावी अशी मागणी केली होती. महानगरपालिकेमध्ये न्यायालयाला सादर वस्तू तात्पुरत्या वेळेसाठी देण्यात यावी ह्यासाठी ठराव ही मंजूर झाला होता. ठरावातील दिलेला कालावधी पूर्ण होऊनही एक वर्ष सहा महिने झाले तरीही न्यायालयाने सदर वास्तू  वापरात घेतली नाही. वारंवार वारकऱ्यांनी आयुक्तांना भवनाची मागणी केली असता त्यांना तारखां व्यतिरिक्त काहीही मिळाले नाही. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आज खासदार राजन विचारेंनी जेष्ठ नागरिक संघ, वारकरी संप्रदायाचे शिष्ठ मंडळ  व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कलावंतांना घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून निवेदन दिले  व वारकरी भवन सर्व संस्थेंना परत मिळवून दिले. या वेळेला आयुक्तांनी लेखी स्वरुपात पत्र सर्व संस्थेंना दिले व हा विश्वास दर्शवला की न्यायालयाकडून सदर इमारत मिळतात आपल्या सर्व संस्थांकडे सुपूर्त केली जाईल. या वेळी निवेदन देताना खासदार राजन विचारे, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, जेष्ठ नागरिक मध्यवर्ती समिती ठाणेचे प्रतिनिधी बळवंत कर्वे, संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउली सेवा मंडळ ठाणे वारकरी समाजाचे प्रतिनिधी दिनकर पाचांगे व अखिल भारतीय नाट्य परिषद ठाणे शाखेचे कार्याध्यक्ष विध्याधर ठाणेकर व सदर संस्थेंचे कार्यकर्ते उपस्थित होते.   

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMumbaiमुंबई