शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

खंडणीसह अनेक गुन्हयांमध्ये वॉन्टेड गुंड अखेर ठाण्यात जेरबंद

By जितेंद्र कालेकर | Updated: October 24, 2020 01:12 IST

गंभीर स्वरुपाच्या २४ गुन्हयांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार ओमकार सतीश भोसले (२१) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी रिव्हॉल्व्हरही हस्तगत करण्यात आली आहे.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेच्या युनिट पाचची कारवाई खूनाच्या प्रयत्नासह २४ गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : खंडणी, जबरी चोरी आणि खूनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरुपाच्या २४ गुन्हयांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार ओमकार सतीश भोसले (२१, रा. कोलशेत रोड, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने अटक केली. त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यात आले आहे. त्याला २७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले.ओमकार याच्यावर नौपाडा, कासारवडवली, वागळे इस्टेट आणि चितळसर या पोलीस ठाण्यांमध्ये हाणामारी, जबरी चोरी आणि खूनाचा प्रयत्न असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील वागळे इस्टेटमधील दोन तर वर्तकनगर आणि कासारवडवली येथील प्रत्येकी एक अशा चार गुन्हयांमध्ये तो गेल्या पाच महिन्यांपासून वॉन्टेड होता. तो वागळे इस्टेट, श्रीनगर भागातील हनुमाननगरमधील मुनशी तबेल्याच्या समोर येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार दिलीप शिंदे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, अनिल सुरवसे, भूषण शिंदे पोलीस हवालदार दिलीप शिंदे, राजेश क्षत्रीय, जगदीश न्हावळदे, शिवाजी रायसिंग, जमादार प्रदीप कदम, बाबू चव्हाण, निवृत्ती महांगरे, हवालदार जाधव, संजय सोंडकर, विजय गोरे, अजय फराटे, शशीकांत नागपूरे, राजेंद्र गायकवाड, मनोज पवार, पोलीस नाईक अजित शिंदे कल्पना तावरे आणि सुजाता शेलार आदीच्या पथकाने २२ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ओमकार याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि एक जिवंत काडतुस हस्तगत केले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याखाली श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त दीपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने यशस्वी केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी