शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

थेंबभर पाण्यासाठी भटकंती, वाडा तालुक्यातील दुर्गम भागात नित्याचीच पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 23:54 IST

वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिवेपाडा, सागमाळ, जांभुळपाडा, टोकरेपाडा या पाड्यांतील सातशेहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

- वसंत भोईर

वाडा :  ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. अशीच अवस्था वाडा तालुक्यातील दुर्गम, आदिवासी लोकवस्ती असलेल्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी धडपडणाऱ्या अनेक पाड्यांतील नागरिकांची झाली आहे. स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत येथील नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून पिण्याच्या पाण्याच्या सुविधा देण्याची फक्त आश्वासने मिळालेली आहेत. प्रत्यक्षात आश्वासनांची कार्यवाही न झाल्याने येथील नागरिकांना होळीनंतर पाऊस पडेपर्यंत पाण्यासाठी वणवण भटकत रहावे लागत आहे.वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगदा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिवेपाडा, सागमाळ, जांभुळपाडा, टोकरेपाडा या पाड्यांतील सातशेहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या चारही पाड्यांपासून मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण अवघे एक ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. असे असतानाही स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांत येथील आदिवासींना पाण्यासाठी झगडावे लागत आहे.वाडा तालुक्याला पाच नद्यांची देणगी असूनही या पाण्याचे नियोजन नसल्याने तालुक्यातील अनेक गाव-खेड्यांतील नागरिकांना उन्हाळ्यातील दोन ते तीन महिने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. येथील नागरिकांचा पिण्याच्या, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी तालुक्यात असलेल्या पाच नद्यांपैकी कुठेतरी एखादे मोठे धरण व्हावे, अशी मागणी तालुक्यातील एकाही लोकप्रतिनिधींनी केलेली नाही.वाडा तालक्यातील भूमिपुत्र असलेले दामोदर शिंगडा हे २५ वर्षे खासदार होते, ल. का. दुमाडा हे पाच वर्षे खासदार होते, शंकर आबा गोवारी हे दहा वर्षे आमदार होते; तर या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विष्णू सवरा हे ३० वर्षे आमदार होते. यामधील सहा वर्षे ते आदिवासी विकासमंत्रीही होते. वाडा तालुक्याला सध्या दौलत दरोडा, सुनील भुसारा, शांताराम मोरे असे तीन आमदार असताना अनेक गावांमधील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असेल, तर यासारखे दुर्दैव ते कोणते? असा सवाल आदिवासी उपस्थित करू लागले आहेत.

पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिलांना रात्रंदिवस भटकंती करावी लागत असल्याने त्यांचा रोजगार बुडतो.- गणपत दोडे, माजी सरपंच,ओगदा ग्रामपंचायत

पाणीटंचाई असलेल्या ओगदा व तुसे परिसरातील काही पाड्यातील नागरिकांची टँकर मागणी आलेली आहे. लवकरच येथे टँकरने पाणीपुरवठा केला जाईल.- विनोद गुजर, पाणीपुरवठा विभाग,पंचायत समिती, वाडा.

टॅग्स :Waterपाणीpalgharपालघर