शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

विसर्जन करणा-यांना हवे जॅकेट, ठोस मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:56 IST

पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरांमधील कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा कल वाढत आहे.

बिर्लागेट : पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केडीएमसी प्रशासनाने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरांमधील कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा कल वाढत आहे. त्यामुळे विसर्जनस्थळी होणारे अपघातही घटले आहेत. मात्र, शहरांतील नैसर्गिक तलाव, सार्वजनिक विहिरी, खाडीकिनारी येथे आजही कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातून तरुण विसर्जन करण्यासाठी येतात. प्रशासनाकडून त्यांना जीवरक्षक जॅकेट, विमा कवच अथवा मानधनही मिळत नाही. या सुविधा पुरवण्याची मागणी त्यांनी केली आहे.गणेशोत्सव काळातील होणारे जल व ध्वनि प्रदूषण टाळण्याठी केडीएमसी व पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. विसर्जनासाठी केडीएमसीने महापालिका हद्दीत कृत्रिम तलाव आणि प्लस्टिकच्या टाक्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात या तलावांमध्ये विसर्जन झाले. विसर्जनासाठी येथे वीजपुरवठ्या जनरेटर व्हॅन, पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दलाचे जवान, गोताखोर तसेच भाविकांना आरती करण्यासाठी मंडपात टेबलची व्यवस्थाही करून दिली जात आहे. मात्र, नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी या सुविधा असल्या तरी विसर्जन करणारे तरुण जीव धोक्यात घालून गणेशमूर्तींचे विसर्जन करत आहेत.कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागांत म्हारळ, वरप, कांबा गावांतील पाचवामैल, रायता, आपटी चोण येथील संगम, आणे भिसोळ येथे उल्हास व बारवी नदीकिनारी तसेच येथील गणेश घाटावर विसर्जन केले जाते. परंतु, नद्यांच्या पातळीचा अंदाज न आल्याने अनेक गणेशभक्तांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. हे अपघात रोखण्यासाठी कल्याण तहसील कार्यालयाने नदीच्या काठावरील गावांतील पट्टीच्या पोहणाºया ८० ते १०० तरुणांची यादी तत्कालीन तहसीलदार नितीन चव्हाण यांनी तयार केली होती. त्यात रायता येथील २२, गोवेली सात , कांबा व वरप प्रत्येकी १०,म्हारळ १५, टिटवाळा दोन , गुरवली व वासुंद्री येथील प्रत्येकी एक आणि कोळीवाडा येथील १० जण आहेत.ग्रामीण भागातील आदिवासी, कोळी, कातकरी तरुण पोहण्यात तरबेज आहेत. गावातील खाडीकिनारी, तलाव तसेच अन्य जलस्त्रोतांची खोली, त्यातील खचखळगे यांची पूर्ण माहिती त्यांना असते. त्यामुळे प्रशासनातर्फे त्यांना विसर्जनासाठी बोलावले जाते. हे तरुण गणेशोत्सवात मिळणाºया या रोजगाराच्या शोधात कल्याण-डोंबिवली परिसरातही जातात. मात्र, प्रशासनाकडून लाइफ जॉकेट, ठोस मानधन किंवा विमाही उतरवला जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, यंदा प्रथमच कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने विसर्जन करणाºया कोळी तरुणांनाविमा उतरवत एक आदर्श घालून दिला आहे.दरम्यान, रायता येथील अश्वमेध प्रतिष्ठानने तहसीलदार व पोलीस प्रशासनाला विसर्जनावेळी नेहमीच सहकार्य केले आहे. संस्थेच्या सभासदांनी आपटी, रायते, गोवेली, मानिवली, वाघेरापाडा, पाचवामैल, वरप, कांबा, म्हारळ येथे विसर्जनस्थळावर प्रत्यक्ष मूर्तींचे विसर्जन, गर्दीचे नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन आदी कामे केली आहेत. अविनाश हरड, नरेश सुरोशे, तुषार पवार, सुदाम भोईर, रवींद्र सुरोशे, जगण देसले आदी तरु णांनी विसर्जनाच्या काळात बुडणाºयांचे जीव वाचवले. त्याची दखल तत्कालीन पोलीस अधीक्षक अर्चना त्यागी यांनी घेत या तरु णांचा सन्मान केला होता. परंतु, सध्या विसर्जनावेळी पोलिसांना विविध सामाजिक संस्था मदत करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव