शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांचे मतदान ठरणार निर्णायक, चाळिशी पार केलेले ६० टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:56 IST

ठाणे, कल्याण आणि भिवंडी या लोकसभेच्या तिन्ही मतदारसंघांत ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत.

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या लोकसभेच्या तिन्ही मतदारसंघांत ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत. यात ३९.६२ टक्के म्हणजे २४ लाख १४ हजार ३८९ मतदार चाळिशीच्या आतील आहे. त्यांना आकर्षित करण्यासाठी या तिन्ही मतदारसंघांतील उमेदवार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. एवढेच नव्हे तर त्यांना प्रचार रॅलीत सहभागी करून घेण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहेत. यामुळे या तरुणांचे मतदान निर्णायक ठरण्याचे चिन्ह दिसून येत आहे.लोकसभेच्या या तिन्ही मतदारसंघांत ४० वर्षांच्या पुढील ६०.३८ टक्के म्हणजे ३६ लाख ७९ हजार ९१९ मतदार आहेत. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील २४ लाख १४ हजार ३८९ युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी जो तो प्रयत्न करताना दिसून येत आहे. प्रमुख उमेदवारांच्या प्रचारात युवा मतदारांचा मोठ्या प्रमाणात भर आहे. या युवा मतदारांमध्ये १८ ते १९ वयोगटांतील ४३ हजार ७५८ नवमतदार आहेत. यामध्ये २६ हजार ४५ युवक, तर १७ हजार ७१३ युवतींचा समावेश दिसतो. मतदानाचा हा पहिलाच अनुभव घेण्यासाठी हे नवमतदार उत्सुक आहेत.याशिवाय, २० ते २९ वर्षे या वयोगटांतील आठ लाख ९९ हजार ३५२ मतदार असून त्यात पाच लाख १८ हजार ४८४ पुरु ष आणि तीन लाख ८० हजार ७४५ महिला मतदार आहे. याशिवाय, तृतीयपंथींचे इतर मतदान म्हणून १२३ जणांचा समावेश आहे.वय वर्षे ३० ते ३९ दरम्यान असणारे मतदार १४ लाख ७१ हजार २७९ असून त्यात सात लाख ९३ हजार १८१ पुरु ष, सहा लाख ७७ हजार ९७० महिला आणि १२८ इतर मतदार आहेत. या युवा मतदारांसह जिल्ह्यात चोखंदळ मतदार म्हणून चाळिशीच्या पुढील ६०.३८ टक्के म्हणजे ३६ लाख ७९ हजार ९१९ मतदारांना आपलेसे करण्यासाठी निवडणूक रिंगणातील ६६ उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहे.>कल्याण लोकसभा मतदारसंघ : १९ लाख २८ हजार ५४ मतदार असून त्यात १० लाख ४१ हजार २२३ पुरु ष, तर आठ लाख ८६ हजार ६४७ महिला आणि १८४ इतर मतदार आहेत. या मतदानासाठी या मतदारसंघात २८ उमेदवार प्रचार करून मतदारांना विनंती करत आहे.>जिल्ह्यात पावणेअठ्ठावीस लाख महिला मतदारलोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६० लाख ९४ हजार ३०८ मतदारांना मतदानाचा हक्क आहे. यात ३३ लाख २२ हजार ९६५ पुरु ष, तर २७ लाख ७१ हजार तीन महिला आणि ३४० इतर मतदार आहेत. याशिवाय, ४० अनिवासी भारतीय तर ९४९ सैनिक मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील या मतदारसंख्येत लवकरच पुरवणी मतदारांचा नव्याने समावेश होईल.>ठाणे लोकसभा मतदारसंघया मतदारसंघात संपूर्ण शहरी भाग समाविष्ट आहे. ठाण्यासह नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदर या महापालिका या लोकसभा मतदारसंघात आहेत. यात २३ लाख सात हजार ७३५ मतदार असून १२ लाख ६० हजार ५६५ पुरु ष, तर १० लाख ४७ हजार १२७ महिला आणि ४३ इतर मतदार आहे.भिवंडी मतदारसंघयात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात १८ लाख ५८ हजार ५१९ मतदार आहेत. यात १० लाख २१ हजार १७७ पुरु ष व आठ लाख ३७ हजार २२९ महिला व ११३ इतर मतदार म्हणजे तृतीयपंथींचा समावेश आहे. या मतदारसंघात १५ उमेदवार प्रचारात गुंतले आहेत.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे