शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

‘मतदान’ प्रोत्साहनासाठी धावताहेत घंटागाड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:21 IST

नागरिकांमध्ये मतदानाविषयी असलेला निरुत्साह दूर करून या लोकसभा निवडणुकीत कमीत कमी ७० टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत.

- सुरेश लोखंडेठाणे : नागरिकांमध्ये मतदानाविषयी असलेला निरुत्साह दूर करून या लोकसभा निवडणुकीत कमीत कमी ७० टक्के मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात जिल्ह्णातील सहा महापालिकांनादेखील सहभाग घेतला आहे. त्यांच्याकडून दररोज कचरा घेण्यासाठी शहरभर धावणाऱ्या ५२७ घंटागाड्यांद्वारे नागरिकांना, महिलांना आणि युवकयुवतींना आॅडिओ क्लिप ऐकवली जात आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून होत आहे.जिल्ह्णातील मतदानाची टक्केवारी वाढावी, कमीतकमी ७० टक्के मतदान १८ विधानसभा मतदारसंघांत व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार जागृती करून ‘मतदान’ करण्यासाठी आवाहन करणारे उपक्रम हाती घेतले. याप्रमाणेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी आणि मीरा-भार्इंदर या महापालिका प्रशासनासदेखील निवडणूक यंत्रणेने आदेश जारी करून ‘मतदान’ टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप उपक्रम दिले आहेत. यास अनुसरून रोज कचरा घेण्यासाठी गल्लीगल्लींत धावणाºया घंटागाड्यांवर स्पीकर लावले आहेत. या स्पीकरद्वारे नागरिकांना आॅडिओ कॅसेट ऐकवली जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून जिल्हा निवडणूक यंत्रणेकडे केला असल्याचे ‘मतदान’ जनजागृती स्वीप उपक्रमांच्या नोडल अधिकारी, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी लोकमतला सांगितले.शहरातील घराघरांतील कचरा गोळा करण्याच्या दैनंदिन कामासह महापालिकांच्या घंटागाड्या मतदारांना २९ एप्रिलच्या त्यांच्या मतदानाच्या हक्काची जाणीव करून देत आहेत. या गाड्यांना लावलेल्या स्पीकरमधील मंजूळ आवाजासह गीतांच्या माध्यमातून ‘मतदान’ हक्क बजावण्याचे आवाहन महिलावर्गांसह परिवारातील नागरिकांना करत आहेत. यासाठी ठाणे शहरात सर्वाधिक १५० घंटागाड्या रोज सकाळ, दुपारच्या त्यांच्यावेळेत धावत आहेत. याखालोखाल कल्याण-डोंबिवली मनपाच्या शहरांमध्ये १४० घंटागाड्या मतदानाची जाणीव करून देत आहेत. याशिवाय, नवी मुंबईला ११९, अंबरनाथला ५६ भिवंडी, ५४ तर उल्हासनगर शहरात आठ घंटागाड्या धावत आहेत.>‘मतदान’ हक्काची जाणीव लोकचळवळ व्हावीगेल्या लोकसभा निवडणुकीला जिल्ह्णातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातच सर्वात कमी अवघे ३८ टक्के म्हणजे अत्यल्प मतदान झाल्याची नोंद आहे. यापेक्षा एक टक्का जास्त अंबरनाथला ३९ टक्के फारच कमी मतदान झाल्याची नोंद आहे. यामुळे येथील ‘मतदान’ हक्काची जाणीव जनजागृतीऐवजी लोकचळवळ होणे अपेक्षित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019thane-pcठाणे