शहरं
Join us  
Trending Stories
1
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
2
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
3
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
4
BMC Election 2026: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
5
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
6
Maharashtra BMC Election Exit Poll Result Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
7
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
8
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
9
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
10
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
11
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
12
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
13
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
14
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
15
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
16
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
17
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
18
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
19
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
20
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
Daily Top 2Weekly Top 5

'मतदान हा लोकशाहीचा कणा; ठाण्यात मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग', एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

By अजित मांडके | Updated: January 15, 2026 13:50 IST

राज्यातील २९ महापालिकांसह ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया सुरू असून, ठाण्यात मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

- अजित मांडके ठाणे - राज्यातील २९ महापालिकांसह ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया सुरू असून, ठाण्यात मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिंदे म्हणाले, “सगळीकडे सकारात्मक वातावरण असून नागरिक उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. लोकशाही व्यवस्थेत मतदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मतदानाचा आपला हक्क कुणीही हिरावून घेऊ नये. प्रत्येक मताचे मोल खूप मोठे असून शहराच्या विकासासाठी आणि भविष्यासाठी ते निर्णायक ठरते,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

राज ठाकरे यांनी मांडलेल्या मतदानावरील शाईच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे. “ही शाई अनेक वर्षांपासून वापरली जात असून बोगस मतदान होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या प्रश्नावर बोलताना शिंदे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी यंत्रे बंद पडली असतील, त्याची तात्काळ नोंद घेतली जाते. “निवडणूक आयोग याबाबत सतर्क असून मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जाते,” असे त्यांनी नमूद केले.

बोगस मतदानाच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, सर्व पक्षांचे कार्यकर्ते मतदान केंद्रांबाहेर उपस्थित असतात. त्यामुळे गैरप्रकार होऊ नयेत याची दक्षता घेतली जाते. “बोगस मतदान होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने लक्ष ठेवणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजप नेते गणेश नाईक यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता हात जोडून प्रश्न टाळला.

English
हिंदी सारांश
Web Title : Voting: Backbone of Democracy; Enthusiastic Participation in Thane, Says Shinde

Web Summary : Eknath Shinde hailed Thane's voter enthusiasm in the municipal elections. He emphasized voting's importance in democracy and addressed concerns about EVM glitches and fake voting, assuring vigilance. He avoided commenting on Ganesh Naik.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६