शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शनिवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दौरा, ३ हजार बूथ वॉरियर्ससोबत साधणार थेट संवाद

By सदानंद नाईक | Updated: October 27, 2023 20:33 IST

Chandrashekhar Bawankule: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर रविवारी उल्हासनगर दौरा असून टॉउन हॉल मध्ये उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील ३ हजार बूथ वारीयर्स सोबत ते संवाद साधणार आहेत.

- सदानंद नाईक उल्हासनगर - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर रविवारी उल्हासनगर दौरा असून टॉउन हॉल मध्ये उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील ३ हजार बूथ वारीयर्स सोबत ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर घर चलो अभियान अंतर्गत बावनकुळे नागरिकासोबत संवाद साधून सभा घेणार असल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी दिली आहे.

कल्याण लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी बाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा रविवारी उल्हासनगर दौरा आहे. दुपारी ४ ते साडे पाच वाजण्याच्या दरम्यान ते टॉउन हॉल मध्ये कल्याण लोकसभा क्षेत्रातील उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभेतील ३ हजार बूथ वारीयर्स सोबत संवाद साधणार आहे. त्यानंतर ६ वाजता कॅम्प नं-१ येथील जुना बस स्टॉप, भाजी मार्केट परिसरात घर चलो अभियान अंतर्गत नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. यावेळीं स्थानिक आमदार व पक्षाच्या कामाबाबत नागरिकांना प्रश्न विचारणार आहेत. यावेळी त्यांची सभाही आयोजित केली आहे.

कॅम्प नं-१, येथील जुना बस स्टॉप परिसरातील सभेनंतर पुन्हा टॉउन हॉल मध्ये येऊन लोकसभा कोअर समिती पदाधिकाऱ्या सोबत प्रदेशाध्यक्ष संवाद साधून ते कल्याण लोकसभा बाबत मते विचारात घेणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष येणार असल्याने, भाजपा पदाधिकारी कामाला लागल्याचे चित्र शहरात आहे. शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार कुमार आयलानी, माजी अध्यक्ष जमनुदास पुरस्वानी आदींची उपस्थिती होती.

प्रदेशाध्यक्षानंतर केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांच्या दौरा नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कल्याण लोकसभेतून एनडीएचा उमेदवार निवडून येण्यासाठी भाजप पूर्वतयारी करीत असल्याची माहिती शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी माहिती दिली आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर पुन्हा केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर येणार असल्याची संकेत रामचंदानी यांनी दिले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाulhasnagarउल्हासनगर