शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

ईव्हीएमच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:05 IST

ईव्हीएम मशीनचा वापर रद्द करण्याची मागणी करीत अंबरनाथमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला.

अंबरनाथ : ईव्हीएम मशीनचा वापर रद्द करण्याची मागणी करीत अंबरनाथमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अंबरनाथ तहसीलदार कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला. यावेळी तहसीलदारांची भेट घेऊन निवडणुकीत ईव्हीएम यंत्र न वापरण्याबाबतची सूचना करून संबंधित पत्र शासनाकडे पाठविण्याची मागणी केली. अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तहसिलदारांची भेट घेत ईव्हीएम यंत्राद्वारे निवडणुकीची प्रक्रिया न घेण्याची मागणी केली. तहसिलदार कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी घंटानाद केला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बहुजन आघाडीच्या वतीने आघाडीच्या घटक पक्षांनाही आमंत्रित केले होते.उल्हासनगर : ‘ईव्हीएम मशीन हटाव, देश बचाव’ अशा घोषणा देऊन भारिप बहुजन वंचित आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. तसेच तहसीलदारांना निवेदन देऊन ईव्हीएम मशीनचा निषेध केला.भारत लोकशाहीचा देश असून लोकशाहीर नागरिकांचा विश्वास हेच अंतिम सत्य आहे. प्राप्त निवडणूक प्रणालीत ईव्हीएम मशीनद्वारे होणाऱ्या निवडणूका आणि त्यांच्या आकडेवारीमध्ये होणारी तफावत यामुळे लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास ढळत असून, त्याबाबत शंका निर्माण होत आहे. जगातील सर्व प्रगत देशांनी ईव्हीएम मशीन नाकरली असून भारत सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगच याचा का आग्रह धरत आहे, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याचे मत पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर बागूल यांनी यावेळी व्यक्त केले.भार्इंदरमध्ये ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’भार्इंदर : भारिप पुरस्कृत वंचित आघाडीच्या वतीने मतदानासाठी वापरली जाणारी ईव्हीएम यंत्र पद्धती हटवण्यासाठी सोमवारी भार्इंदरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (नगर) भवन बाहेर निदर्शने करण्यात आली. ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’, अशा घोषणा देत देशभरात मोदी आणि भाजप विरोधाची लाट असताना गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा कशा जिंकल्या? असा सवाल करत देश वाचवायचा असेल तर ईव्हीएम हटवून मतिपत्रकेचा वापर पुन्हा सुरु झाला पाहिजे अशी मागणी भारिपसह वंचित आघाडीतील सुनिल भगत, महेन्द्र कांबळे, के.के ठोकळ, रोहीत आसले, सुमीत जामनिक, संभाजी चिकटे, अ‍ॅड. यशवंत गायकवाड, वसंत कांबळे, सलीम खान, संगीता खडसे, अमिता धारस्कर आदींसह कार्यकर्त्यांनी केली. या वेळी मंडळ अधिकाºयास निवेदन देण्यात आले.

टॅग्स :Bharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ