शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

डेब्रिजच्या कायद्याचे उल्लंघन;मीरा-भाईंदरमध्ये माफियांचे राज्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 00:25 IST

बेकायदा कुठेही टाकले जाते

मीरा रोड : गेल्यावर्षी मीरा- भाईंदर महापालिकेने मोठा गाजावाजा करत बांधकामातून निघणाऱ्या कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे कायद्यासह स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत डेब्रिज टाकण्यासाठी चार आरक्षणाच्या जागा जाहीर केल्या होत्या. पण वर्ष झाले तरी शहरात सर्रास डेब्रिज बेकायदा कुठेही टाकले जात असतानाच महापालिका मुख्यालयातून निघणारे डेबिजही नियमबाह्यपणे टाकले जात असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

कायद्याप्रमाणे बांधकामाच्या कचºयाची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. रोज २० टनापेक्षा अधिक व महिन्यास ३०० टनापेक्षा अधिक बांधकाम कचरा निर्माण करणाºयाने त्याचे वर्गीकरण करुन काम सुरु करण्याआधी बांधकाम कचºयाच्या विल्हेवाटीचा आराखडा महापालिकेस सादर करणे बंधनकारक आहे. तर कमी डेब्रिज उत्पादकांना मूळ जागीच त्याची विल्हेवाट लावायची आहे. १० ते २० टक्के बांधकाम कचरा हा पालिका वा सरकारने मंजुरी दिलेल्या बांधकामासाठी वापरणे कायद्याने बंधनकारक आहे. बांधकाम कचºयाची विल्हेवाट लावणे कायदा आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आयुक्त बालाजी खतगावकर व बांधकाम विभागाने मोठा गाजावाजा करत डेब्रिज आदी टाकण्यासाठी प्रभाग अधिकारी व नगररचना विभागाकडून मंजुरी घेऊनच पालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या आरक्षण क्र. २७०, २७२, ३२१ व ३५६ या निश्चित केलेल्या जागा जाहीर केल्या होत्या. घर, सोसायटी दुरूस्तीमधून निघणारे डेबिज उचलून कुठेही बेकायदा टाकणारे माफिया शहरात तयार झाले असुन यातून अतिक्रमण, बेकायदा बांधकाम करण्यासाठी भराव करून देण्यासह बक्कळ पैसे उकळले जात आहेत. यात पालिकेच्या माती भराव विरोधी पथकासह प्रभाग समिती कार्यालये आणि आरोग्य विभागाचेही साटंलोटं असल्याने कारवाई केली जात नाही. बेकायदा डेब्रिज, माती आदीच्या भरावामुळे पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक मार्गही बंद होण्याच्या मार्गावर आले आहेत. भरावामुळे शहरात पाणी तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत. बेकायदा डेब्रिज व भराव माफियांनी धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे पालिका आणि लोकप्रतिनीधी मूग गिळून आहेत.विनापरवानगी वाहतूक : कायद्याप्रमाणे त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याची आवश्यकता असून निदान पालिकेने जाहीर केलेल्या जागांवर ते रितसर परवानगी घेऊन टाकणे गरजेचे होते. परंतु कंत्राटदाराने परस्पर एका भराव माफियास डेब्रिज उचलण्याचे काम देऊन ते डंपरमध्ये भरले होते. परंतु डंपरचालक वा कंत्राटदाराकडे डेब्रिज वाहतुकीची कोणतीच परवानगी नव्हती. त्यामुळे आरोग्य विभागाने छायाचित्रे आणि माहिती घेतली.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक