शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विनोद तावडे यांनी केली प्रियंका गांधींची शूर्पणखेशी तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 03:09 IST

रावणाने बहीण शूर्पणखा, हिरण्यकश्यपूने होलिका आणि कंसाने पूतनामावशीस विरोधकांविरुद्ध वापरल्याचा इतिहास आहे. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

भिवंडी : रावणाने बहीण शूर्पणखा, हिरण्यकश्यपूने होलिका आणि कंसाने पूतनामावशीस विरोधकांविरुद्ध वापरल्याचा इतिहास आहे. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता राहुल गांधी यांनी प्रियंका गांधींना प्रचारात उतरविले असून त्यांनाही पराभवालाच सामोरे जावे लागेल. काही वर्षांनी प्रियंकांचा मुलगाही प्रचारात उतरलेला पाहावयास मिळेल, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी भिवंडी येथे भाजपाच्या बैठकीत केली.भिवंडी तालुक्यातील अंजूर येथे ठाणे व पालघर विभागांतील भिवंडी, कल्याण, पालघर व ठाणे या चार लोकसभा मतदारसंघांतील शक्तिप्रमुखांची बैठकरविवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, राजेंद्र गावित, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, महेश चौघुले, नरेंद्र पवार, पास्कल धनारे, ज्येष्ठनेते जगन्नाथ पाटील, दिगंबरविशे, संघटनमंत्री सतीश धोंड, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, शहराध्यक्ष संतोष शेट्टी, संदीपलेले आदी उपस्थित होते. या बैठकीला दोन्ही जिल्ह्यांतील शक्तिप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या शक्तिकेंद्रप्रमुखांमार्फत बुथ मजबूत करण्यासाठी आढावा घेण्यात आला. तावडे यांनी व्यासपीठावरून खालीउतरून कार्यकर्त्यांशी संवादसाधला.राहुल गांधी देशद्रोही असल्याचा आरोपराफेल करारासंदर्भात आरोप करणारे राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष देशद्रोही असल्याची टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली. पूर्वी हिंदी चित्रपटांत रॉबर्ट नावाचा खलनायक असे. आताच्या रॉबर्टनेही अशीच लूट चालविली असल्याची टीका भातखळकर यांनी रॉबर्ट वाड्रा यांचे नाव न घेता केली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे