शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विहंग, रा. फ. नाईक संघाने उंचावला जे.पी. स्मृतीचषक, किशोर-किशोरी गटाची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 6, 2022 16:20 IST

दी युनायटेड स्पोर्टस क्लबच्या आवारात ही स्पर्धा पार पडली. 

ठाणे : विहंग क्रीडा मंडळ आणि रा. फ. नाईक विद्यालयाने अंतिम लढतीत सहज विजय मिळवत दी युनायटेड स्पोर्टस क्लबने दत्तजयंती उत्सवानिमित्ताने आयोजित केलेल्या जनार्दन पांडुरंग कोळी तथा जे.पी कोळी स्मृती ठाणे जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत अनुक्रमे किशोर आणि किशोरी गटाचे विजेतेपद मिळवले. दी युनायटेड स्पोर्टस क्लबच्या आवारात ही स्पर्धा पार पडली. किशोर गटाच्या अंतिम सामन्यात विहंग क्रीडा मंडळाने फादर एग्नेल संघाचा ९-६ असा एक डाव ३ गुणांनी धुव्वा उडवला. सामन्याच्या पहिल्या डावापासून खेळाची सूत्रे आपल्या हाती ठेवताना विहंगने पहिल्या डावात ९-२ अशी भक्कम आघाडी घेतली होती. फॉलोऑन मिळाल्यावर देखील फादर एग्नेल संघाला सात गुणांची पिछाडी भरुन काढता आली नाही. संघाला विजेतेपद मिळवून देताना करण गुप्ताने संरक्षणात अनुक्रमे २.५० आणि १.३० मिनिटे पळतीचा खेळ करत आक्रमणात ३ गडी बाद केले. ओंकार सावंतने अनुक्रमे २.५० आणि २.२० मिनिटे पळतीचा खेळ केला.याशिवाय आक्रमणात दोन गुण मिळवत करणला चांगली साथ दिली. पराभुत संघाच्या विनायक भणगे, वेदांत शिवले, आयुष नरे आणि गणेश बिराजदारने बऱ्यापैकी खेळ केला.

मुलींच्या अंतिम लढतीत रा.फ.नाईक विद्यालयाने ज्ञानविकास फाऊंडेशनचे आव्हान २०-१५ असे परतवून लावले. सामन्याच्या पूर्वार्धात रा.फ.नाईक विद्यालयाने १०-७ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावातही विजेत्या संघाने १० गुण नोंदवत चांगले आव्हान प्रतिस्पर्ध्यांसमोर उभे केले होते. पण या आव्हानाची पूर्तता करण्यात ज्ञानविकास संघ अपयशी ठरला. जेत्यांच्या अदिती कोंढाळकरने आक्रमणात ४ गुण मिळवून १.५०मिनिटे पळतीचा खेळ केला. पराभुत संघाचा बचाव भेदताना वैष्णवी जाधवने ६ गुण मिळवत १.५० मिनिटे संरक्षण केले. अदिती दौंडकरने ३ गुण आणि १.१० मिनिटे संरक्षण केले. ज्ञानविकास फाऊंडेशनच्या प्राची वांगडे आणि स्वरा साळुंखेने अष्टपैलू खेळ करत पराभव टाळण्यासाठी लढत दिली.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू -संरक्षक - प्रणिती जगदाळे (रा. फ.नाईक विद्यालय), ओंकार सावंत (विहंग क्रीडा मंडळ)आक्रमक - स्वरा साळुंखे ( ज्ञानविकास फाऊंडेशन), वेद सकपाळ ( फादर एग्नेल)अष्टपैलू - वैष्णवी जाधव ( रा.फ.नाईक विद्यालय), करण गुप्ता ( विहंग क्रीडा मंडळ) 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी