शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : अर्ज भरताना उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 01:25 IST

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात उमेदवारासोबत केवळ चार कार्यकर्त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या कार्यालयाच्या चहुबाजूने शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी शंभर मीटर परिसरात कलम १४४ ( २) अन्वये ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केले आहेत.ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, मुंब्रा कळवा या १३ विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.या १३ विधानसभा क्षेत्र कार्यालयांच्या परिसरात कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिनिधी आदींना बैठक, पत्रकार परिषद आदी कार्यक्र म घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कार्यालयांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात नामनिर्देशन अर्ज दाखल करणारा उमेदवार व त्याच्यासोबत चार व्यक्तींना प्रवेश देण्यात येणारआहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास येणाºया उमेदवारास नमूद ठिकाणच्या कार्यालयाच्या शंभर मीटरच्या चहूबाजूकडील परिसराच्या आत फक्त तीन वाहने आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.तीनपेक्षा अधिक वाहने सदर कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात आणण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा आदेश ७ आॅक्टोबर मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहणार आहे. या मनाई आदेशाचा भंग केल्यास कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला असल्याने कार्यालयातील गोंधळाचे वातावरण टाळता येणार आहे.खर्चाच्या तक्रारीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत सहा केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या निरीक्षकाना भेटून संबंधित उमेदवारांच्या खर्चाबाबत तक्रार करणे शक्य होणार आहे. यासाठी नागरिकांना त्यांच्या ठिकठिकाणच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान भेटता येणार आहे.निरीक्षकांच्या वास्तव्याचे ठिकाणी नारिकांना भेटून तक्रार करता येणार आहे. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व या मतदारसंघांतील उमेदवारांची तक्रार निवडणूक खर्च निरीक्षक विवेकानंद यांना विद्युत पारेषण गेस्ट हाऊस, तळमजला, पडघा येथे दिलेल्या वेळेत भेटता येणार आहे. शहापूर, कल्याण पश्चिम, मुरबाड मतदारसंघातील उमेदवाराच्या खर्चाची तक्रार निरीक्षक आशिषचंद्र मोहंती यांना त्यांच्या सेंच्युरी रेयॉन गेस्ट हाऊस, वसंत विहार, कल्याण येथील कार्यालयात करण्याची परवानगी दिली आहे.अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व या तीन मतदारसंघांच्या तक्रारीसाठी खर्च निरीक्षक एस.आर. कौशिक यांना आयुध निर्माणी गेस्ट हाऊस, अंबरनाथ येथील कक्ष क्रमांक ५ व ६ येथे जावून भेटता येणार आहे. डोंबिवली, कल्याण ग्रामीण, ठाणे या मतदारसंघांतील तक्रारीसाठी शिवस्वरूप सिंग, यांना कक्ष क्र .४, डोंबिवली जिमखाना, डोंबिवली येथे संपर्क साधता येणार आहे. मीरा- भार्इंदर, ओवळा-माजिवाडा, कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघांतील उमेदवारांची तक्रार निरीक्षक उमेश पाठक यांच्याकडे कक्ष क्र .२७, रेमंड गेस्ट हाऊस येथे व रूम नं.२, सूर्या, शासकीय विश्रामगृह, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, ठाणे (प.) येथे करता येईल. मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर या मतदारसंघांसाठी तक्रार के. रमेश यांच्याकडे नागरिकांना रूम नं.४, सिडको गेस्ट हाऊस, किल्ले गावठान बेलापूर, नवी मुंबइ, येथे जावून दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी ११ ते दुपारी १२ दरम्यान करता येईल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019