शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

Vidhan sabha 2019 : केंद्रीय समितीच्या अहवालाने केला आमदार नरेंद्र पवार यांचा घात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 02:31 IST

कल्याण पश्चिममधील पक्षाच्या आमदाराविरोधात १० इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचा अहवाल मुलाखत घेणाºया पक्षाच्या मंडळीने पक्षाच्या कोअर कमिटीला दिला होता.

कल्याण : कल्याण पश्चिमेचे भाजप आमदार नरेंद्र पवार हे पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, या मतदारसंघाबाबत फेरविचार करायला हवा, असा पक्षाच्या केंद्रीय पाहणी समितीने दिलेला सुस्पष्ट अहवाल आणि पक्षातील इच्छुकांनी पवारांविरोधात नाराजी व्यक्त करत उमेदवार बदलून देण्याची केलेली मागणी विचारात घेऊन, भाजपने केवळ पवार यांचा पत्ताच कट केला नाही तर, हा मतदारसंघच सेनेला देऊन टाकल्याची माहिती समोर आली आहे.कल्याण डोंबिवलीतील कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या चार मतदारसंघांसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सप्टेंबरमध्ये डोंंबिवलीत पार पडल्या. त्यावेळी कल्याण पश्चिम मतदारसंघातून जवळपास १० उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मुलाखत घेणाऱ्या पक्षश्रेष्ठींनी निवडणूक रिंगणात का उतरू इच्छिता, अशी इच्छुकांना विचारणा केली असता, त्यांनी स्थानिक आमदाराविरोधात नाराजी असल्याचे मत मांडले होते. पक्षाच्या आमदाराविरोधात १० इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचा अहवाल मुलाखत घेणा-या पक्षाच्या मंडळीने पक्षाच्या कोअर कमिटीला दिला होता. मुलाखत घेणारी मंडळी हा अहवाल सादर करणार की नाही, याविषयीही साशंकता असल्याने इच्छुकांनी पक्षाध्यक्षांकडे धाव घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली. इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी देण्याची मागणीही त्यांनी केली. अंतर्गत विरोध आणि केंद्रीय कमिटीचा अहवाल पवार यांच्या नकारात्मक बाबी मांडणारा होता. त्यांची मतदारसंघातील कामगिरी चांगली नसल्याचेही सांगण्यात आले होते. हे मुद्दे विचारात घेऊन पवार यांच्या नावावर काट मारण्यात आली. मात्र इच्छुकांपैकी एकही उमेदवार सक्षम नसल्याने त्यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी देण्याचा विचार पक्षस्तरावर करण्यात आला नाही.मतदारसंघातील समस्याही ठरल्या अडसरना खाऊंगा और ना खाने दुंगा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. याच तत्वाचे पालन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्रीही आग्रही असतात. मात्र मतदारसंघात अशा प्रकारच्या तक्रारीही असल्याचा सूर पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी आळवला असल्याचे बोलले जात आहेत.दुसरीकडे, कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी भाजपच्या विरोधात बंडाचे हत्यार उपसले होते. मित्रपक्षाने दिलेला हा इशाराही नरेंद्र पवार यांची उमेदवारी कापण्यात भर टाकणारा ठरला. याशिवाय मतदारसंघात आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची समस्या आहे.आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी पवार यांनी गेल्या चार वर्षांत मंत्रालयस्तरावर केलेले प्रयत्न तोकडे पडले. त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघातील कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडी पुलाच्या कामात दिरंगाई झाल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न कल्याणकरांना सतावत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kalyan-west-acकल्याण पश्चिम