शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: शरद पवारांच्या मैदानात अमित ठाकरेंचे चौकार अन् षटकार! 'लोकल कनेक्ट'ची मनमिळावू 'खेळी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 22:16 IST

शिवसेनेत उभी फूट, शिंदे-फडणवीस सरकारची कायद्याची कसोटी आणि आरोप-प्रत्यारोप असा राजकीय गोंधळ राज्यात सुरू असताना दुसरीकडे मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे मात्र पक्ष बांधणासाठी राज्यभर फिरत आहेत.

ठाणे-

शिवसेनेत उभी फूट, शिंदे-फडणवीस सरकारची कायद्याची कसोटी आणि आरोप-प्रत्यारोप असा राजकीय गोंधळ राज्यात सुरू असताना दुसरीकडे मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे मात्र पक्ष बांधणासाठी राज्यभर फिरत आहेत. अमित ठाकरे यांनी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या पुर्नबांधणीला सुरुवात केली आहे आणि ते अगदी तळागळातील कार्यकर्ते तसंच तरुणांशी संवाद साधत आहेत. यात आज अमित ठाकरेंनी चक्क शरद पवारांच्या मैदानात फटकेबाजी केली. पण हे मैदान राजकीय नसून क्रिकेटचं मैदान होतं. 

ठाण्यातील ढोकाळी येथील शरद पवार मिनी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या विजय शिर्के क्रिकेट अकादमीला आज अमित ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी अमित ठाकरे यांनाही क्रिकेट आणि फुटबॉल खेळण्याचा मोह आवरता आला नाही. विजय शिर्के अकादमीच्या मुलांसोबत त्यांनी फोटोसेशनही केलं. अमित ठाकरे यांनी यावेळी क्रिकेटच्या मैदानात जोरदार फलंदाजी केली. चौकार आणि षटकारांनी खणखणीत फलंदाजी करताना अमित ठाकरे पाहायला मिळाले. येत्या काळात राजकीय मैदानात देखील अमित ठाकरे अशीच फटकेबाजी करताना पाहायला मिळणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

अमित ठाकरे सध्या पक्षाच्या शाखांमध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. यात ते मग कार्यकर्त्यांच्या घरी जेवण करणं असो किंवा मग कोकणातल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेणं असो दौऱ्यात ते कार्यकर्त्यांसोबत मनमोकळेपणानं वेळ व्यतित करत आहेत. आज अमित ठाकरे यांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी करण्याचा आनंद घेतला. याआधी त्यांनी para kabaddi मध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून कामगिरी बजावणाऱ्या सचिन हरिश्चंद्र तांडेल याची भेट घेतली होती. तसंच त्याच्या घरी जेवणाचाही आस्वाद घेतला होता. अशा पद्धतीनं 'लोकल कनेक्ट' ठेवणारी अमित ठाकरेंची मनमिळावू 'खेळी' राजकीय पटलावर कितपत यशस्वी ठरेल हे पाहणं महत्वाचं असेल.  

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस