ठाणे: अंबरनाथमधील प्रसिद्ध उद्योजक डीएम भोईर यांनी मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुप्त मतदान असतानादेखील त्यांनी हा प्रकार केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात चिखलोली परिसरात राहणारे डीएम भोईर यांनी मतदान केंद्रात मतदान करतानाचा स्वतःचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामुळे गुप्त मतदानपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भोईर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संताप निर्माण झाला आहे. ज्या उमेदवाराला मतदान केले तेदेखील या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत असल्याने भोईर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
VIDEO- प्रसिद्ध उद्योजकानं केला मतदानाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 12:32 IST