शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नगरसेवक अनंत शिर्के यांच्या विजयावर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 18:20 IST

न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी (7 फेब्रुवारी)ठाणे येथे झालेल्या फेरमतमोजणीत मीरा भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग ११अ मधून शिवसेना नगरसेवक अनंत शिर्कें यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

मीरारोड - न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी (7 फेब्रुवारी)ठाणे येथे झालेल्या फेरमतमोजणीत मीरा भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग ११अ मधून शिवसेना नगरसेवक अनंत शिर्कें यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. शिर्केंसमोर अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेले सेनेचे बंडखोर सचिन डोंगरे यांनी फेरमोजणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण फेरमोजणीत देखील अपयशच पदरी पडले. 2017मध्ये आॅगस्टमध्ये झालेल्या मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीत प्रभाग ११ मधून शिवसेनेचे प्रवीण पाटील, संध्या पाटील, वंदना पाटील व अनंत शिर्के हे चारही नगरसेवक विजयी झाले होते.यातील ११अ या मागासवर्गीयासाठी राखीव प्रभागातून निवडून आलेल्या शिर्के यांना ४ हजार ३० मतं मिळाली होती. तर शिवसेनेच्याच बंडखोर सचिन डोंगरे यांनी शिर्के यांना चांगलाच घाम फोडत ४ हजार २१ मतं मिळवली होती. अवघ्या ९ मतांनी डोंगरे यांना पराभव झाला होता. वास्तविक सचीन डोंगरे हे आधीपासूनच सेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. डोंगरेंकडे तरुण कार्यकर्त्यांची चांगली संख्या तसेच थेट संपर्क असल्याने त्यांनी शिवसेनेचे तिकीट मागितले होते. परंतु बौद्ध पंचायतन समिती आदींनी शिर्के यांच्या नावासाठी आग्रह धरल्याने शिवसेनेने डोंगरे यांना डावलून शिर्केंना तिकीट दिले. या भागात सेनेचे प्राबल्य असताना ही डोंगरे यांनी जोरदार मुसंडी मारल्याने शिर्केंचा निसटता विजय झाला.निकाला नंतर डोंगरे यांनी फेरमतमोजणीची मागणी करत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगास फेर मतमोजणीचे आदेश दिले होते . दरम्यान प्रभाग ११अ च्या निवडणुकीसाठी वापरलेल्या ३० मतदान यंत्रातील मेमरी कार्ड काढून जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा कक्षात ठेवण्यात आले होते.बुधवारी (7 फेब्रुवारी) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात निवडणूक आयोगाचे उपायुक्त, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत मेमरी कार्ड मधील मतांची पुन्हा मोजणी करण्यात आली. परंतु फेर मोजणीत देखील डोंगरे यांना ४ हजार २१ तर शिर्के यांना ४ हजार ३० इतकीच मतं कायम राहिली. त्यामुळे शिर्के यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या फेरमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना