शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कांजुरमार्ग मेट्रो कारशेडसाठी शाळा, पोलीस अन् परवडणाऱ्या घरांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 02:59 IST

Kanjurmarg metro car shed : या जागेवर उद्यानासह परवडणारी घरे, पोलीस वसाहत, बेघरांसाठीचे निवारे, महावितरणची ट्रान्समिशन सुविधा, मुंबई महापालिकेच्या शाळेसह रस्त्यांचे आरक्षण एमएमआरडीएने आपल्या २०१६-२०३४ च्या विकास आराखड्यात टाकले आहे.

- नारायण जाधव

ठाणे : मुंबई मेट्रोची गोरेगावच्या आरे कॉलनीतील कारशेड रद्द करून ती कांजुरमार्ग येथे स्थलांतरित करण्याच्या निर्णयापुढील महाविकास आघाडीसमोरील अडचणीत केंद्र सरकारच्या हरकतीमुळे वाढ झाली असतानाच आता यासाठीच्या ४३.७६ हेक्टर जागेचे आरक्षण महाराष्ट्र सरकारला बदलावे लागणार आहे. यासाठी आता कुठे नगरविकास विभागाने नोटिफिकेशन काढून हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.कारण, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्यांसह भाजपचा कांजुरमार्ग कारशेडला असलेला विरोध पाहता त्यांच्या कार्यकर्त्यांसह सामान्य जनता आणि केंद्र सरकारकडून हरकतींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य सरकार, एमएमआरडीए आणि मुृंबई मेट्रोपुढील अडचणींत मोठी भर पडणार आहे. या कारशेडसाठी नगरविकास विभागाने एमएमआरडीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे.

कांजुरमार्गच्या जागेवर ही आहेत आरक्षणे या जागेवर उद्यानासह परवडणारी घरे, पोलीस वसाहत, बेघरांसाठीचे निवारे, महावितरणची ट्रान्समिशन सुविधा, मुंबई महापालिकेच्या शाळेसह रस्त्यांचे आरक्षण एमएमआरडीएने आपल्या २०१६-२०३४ च्या विकास आराखड्यात टाकले आहे. ती रद्द करून नगररचना कायदा १९६६ च्या कलम ३७ नुसार ही आरक्षणे वगळण्याबाबत एका महिन्याच्या आत सामान्य जनतेकडून नगरविकास विभागाने हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.

कारशेड पडणार लांबणीवर- या ४३.७६ हेक्टर जागेच्या आरक्षण बदलण्यासाठी महिनाभरात आलेल्या हरकतींवर नगरविकास विभागास जनसुनावणी घ्यावी लागणार आहे.  त्यानंतर त्यावर तोडगा काढून नगररचना संचालकांची परवानगी मिळाल्यानंतरच कारशेड उभारता येणार आहे.  शिवाय, पुन्हा केंद्रीय वने आणि पर्यावरण विभागाची मंजुरी घ्यावी लागणार असल्याने ही कारशेड लांबणीवर पडणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रो