शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात परांजपे विरुद्ध विचारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 01:07 IST

राष्ट्रवादी काँग्रेससाठी तारेवरची कसरत

ठाणे : लोकशाही आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून ठाणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचे नाव घोषित झाले आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना या निवडणुकीत रंगणार आहे. यावेळी लोकशाही आघाडीचाच उमेदवार बाजी मारेल, असा दावा राष्ट्रवादीने केला असून मागील निवडणुकीच्या तुलनेत दुपटीने मते मिळतील, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात कोणाला किती मते द्यायची, हे मतदारराजाच निश्चित करणार आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून हा बालेकिल्ला हिरावून घेण्यात राष्टÑवादीला यश आले होते; परंतु हे यश त्यांना जास्त काळ टिकवता आले नाही. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीचे संजीव नाईक विरुद्ध शिवसेनेचे राजन विचारे यांच्यात सामना रंगला होता. त्यावेळी मोदीलाटेत विचारे यांनी शिवसेनेचा गड पुन्हा आपल्याकडे खेचून घेतला. २०१९ मध्ये राष्टÑवादीकडून नाईक कुटुंबातीलच व्यक्तीच निवडणूक लढवेल, अशी अपेक्षा होती; परंतु नाईक कुटुंबाने निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवल्याने राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. राजन विचारे हे विद्यमान खासदार असून, त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. परांजपे हे ठाण्यात वास्तव्यास असले, तरी त्यांच्यासाठी हा मतदारसंघ तसा नवाच आहे.ऐनवेळी त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आल्याने त्यांना संपूर्ण मतदारसंघापर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नाईक कुटुंबातील एखादा उमेदवार असता, तर कदाचित येथे चुरशीची लढत झाली असती, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आपल्या कामांची पोचपावती सुज्ञ मतदार देईल, असा विश्वास खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, या निवडणुकीत २००९ ची पुनरावृत्ती राष्टÑवादी करेल, असा दावा आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी केला आहे.ठाणे हा शिवसेनेचा गड राहिला आहे. मागील निवडणुकीत या पक्षाने दोन लाख ८५ हजार मतांनी सरशी मिळवली होती. यावेळी ती दुप्पट असेल. मतदारांना माहीत आहे, पाच वर्षांत कुणी काम केले आणि कुणी नाही केले. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच होणार आहे.- राजन विचारे,खासदार, शिवसेनापक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जिल्ह्यातील ज्येष्ठांनी विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत २००९ ची पुनरावृत्ती होईल आणि आघाडीचा विजय होईल.- आनंद परांजपे, राष्टÑवादीशिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे-प्रतिदावे होत असले तरी, सेनेला भाजपाची आणि राष्ट्रवादीला काँग्रेसची कितपत मदत होते, यावरही निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे-प्रतिदावे होत असले तरी, सेनेला भाजपाची आणि राष्ट्रवादीला काँग्रेसची कितपत मदत होते, यावरही निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकthaneठाणेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस