शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्टसाठीची पडताळणी: पोलिसांची घरपोच सेवा, ठाणे ग्रामीण पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

By जितेंद्र कालेकर | Updated: December 26, 2017 20:12 IST

नागरिकांना यापुढे आपल्या पासपोर्टसाठी पोलीस ठाण्यात फे-या मारण्याची गरज राहणार नाही. पासपोर्टच्या पडताळणीसाठी ठाणे ग्रामीणच्या पोलिसांनी ‘एम पासपोर्ट’ या अ‍ॅपद्वारे घरपोच ही सेवा सुरु केली आहे.

ठळक मुद्देपासपोर्ट कार्यालयाच्या मदतीने उपक्रमाची सुरुवातअडीच लाखांच्या खर्चातून सर्व पोलीस ठाण्यांना मिळाले टॅबगतिमान आणि पारदर्शक सेवेसाठी पोलिसांचे एक पाऊल पुढे

जितेंद्र कालेकरठाणे: प्रवास, शिक्षण अथवा पर्यटनासाठी परदेशात जाणा-यांसाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी पारपत्र (पासपोर्ट) पडताळणी अत्यंत सोपी केली आहे. संबंधित अर्जदाराने पासपोर्टसाठी आॅनलाईन अर्ज केल्यानंतर पोलीस संपूर्ण माहिती घेण्यासाठी टॅब घेऊनच घरी पोहचणार आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात जाण्याचीही गरज नसल्यामुळे लोकांचा वेळ आणि खर्चही वाचणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.केंद्र शासनाच्या गतिमान आणि पारदर्शक शासन योजनेंतर्गत पासपोर्ट विभागाने ही योजना राबविण्याचे देशभरातील पोलिस यंत्रणांना सूचित केले आहे. राज्यात काही मोजक्या जिल्हयांमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून त्यामध्ये ठाणे ग्रामीणचा समावेश आहे. त्यानुसार सुमारे अडीच लाख रुपये खर्चातून १७ पोलीस ठाण्यांचे प्रत्येकी दोन कर्मचारी आणि अधीक्षक कार्यालयासाठी एक असे १८ टॅब खरेदी करण्यात आले. पासपोर्टची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी ‘एम पासपोर्ट’ हे अ‍ॅप सुरु केले आहे. त्यामुळे एखाद्याने पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर त्याची फाईल तो वास्तव्यास असलेल्या ठाणे ग्रामीणच्या संबंधित पोलीस ठाण्यात पासपोर्ट कार्यालयामार्फत पाठविली जाते. ती आल्यानंतर त्या पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी संबंधितांच्या घरी जाऊन वास्तव्याची तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी करतात. त्याचवेळी त्याच्याविरुद्ध कोणता गुन्हा वगैरे दाखल आहे किंवा कसे? याचीही माहिती घेतली जाते. ही माहिती घेतल्यानंतर जागीच त्याचा फोटो घेऊन कागदपत्रेही टॅबद्वारेच स्कॅन केली जातात. ही माहिती दुस-याच दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठविली जाते. साधारण तीन ते पाच दिवसांमध्ये ही संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर संबंधितांना आॅनलाईनच पडताळणी झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. पूर्वी याच कामासाठी दोन दोन महिनेही लागत होते. आता हे काम अवघ्या एका आठवडयात तेही कोणत्याही खर्चाविना अल्पावधीत होत असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असल्याची माहिती ठाणे ग्रामीणच्या विशेष शाखेने दिली.‘‘ पूर्वी पासपोर्ट पडताळणीसाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात बºयाच फे-या माराव्या लागत होत्या. आता केंद्र शासनाच्या गतिमान आणि पारदर्शक शासन धोरणांतर्गत पासपोर्ट कार्यालयाच्या मदतीने पासपोर्टसाठी ही घरपोच सेवा नागरिकांना ठाणे ग्रामीणच्या १७ पोेलीस ठाण्यात सुरु केली आहे. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षणही दिले आहे. घरी आलेल्या पोलिसांकडून सौजन्याची वागणूक मिळाल्यानंतर पोलिसांची प्रतिमाही सुधारण्यास मदत होते. कामात गती येऊन लोकांचाही वेळ वाचतो. शिवाय, कामातही पारदर्शकता येते.’’डॉ. महेश पाटील, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण.

टॅग्स :thaneठाणेpassportपासपोर्टPolice Stationपोलीस ठाणे