शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील नौपाडा विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी व्यंकट आंधळे; जयंत बजबळे यांच्याकडे वर्तकनगरची सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 23:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : डान्सबार प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या नौपाडा आणि वर्तकनगर सहायक आयुक्तांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला ...

ठळक मुद्देवर्तकनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी संतोष घाटेकरदोन सहाय्यक आयुक्तांसह दोन निरीक्षकांना डान्सबार प्रकरण भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: डान्सबार प्रकरणात प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या नौपाडा आणि वर्तकनगर सहायक आयुक्तांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आता नौपाडा विभागाची अतिरिक्त सूत्रे कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांच्याकडे तर वर्तकनगर विभागाची अतिरिक्त सूत्रे वागळे इस्टेट विभागाचे जयंत बजबळे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी सोमवारी रात्री काढले आहेत.ठाणे शहरातील नौपाडा विभागातील आम्रपाली आणि अँटीक पॅलेस तसेच वर्तकनगर विभागातील नटराज या तीन बारमध्ये कोरोना संबंधिचे नियम पायदळी तुडवून ते सर्रासपणे रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याची बाब समोर आली. याची थेट राज्याच्या गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली. त्यामुळेच पोलीस आयुक्त सिंह यांनी नौपाडा विभागाच्या नीता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली आहे. तर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आणि नौपाडा पोलीस ठाण्याचे अनिल मांगले यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. आता वर्तकनगरमध्ये त्याच पोलीस ठाण्याचे प्रशासन सांभाळणाऱ्या संतोष घाटेकर यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे दिली आहेत. तर नौपाडा पोलीस ठाण्याचीही सूत्रे त्याच पोलीस ठाण्याचा गुन्हे प्रकटीकरण विभाग सांभाळणाºया रवींद्र क्षीरसागर यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पूरत्या स्वरुपात सोपविण्याचे आदेश ठाणे शहर मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त दत्ता कांबळे यांनी काढले आहेत. घाटेकर आणि क्षीरसागर यांनी मंगळवारी आपल्या नविन पदाची सूत्रेही घेतली आहेत. या बदल्या प्रशासकीय कारणास्तव केल्याचेही या आदेशामध्ये म्हटले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी