शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रस्त्यावर येणारी वाहने जप्त केली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 20:03 IST

अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रस्त्यावर येणारी वाहने यापुढे जप्त केली जाणार असल्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, ठाण्यातील सर्व प्रकारची मद्यविक्रीची दुकानेही १ ते १४ एप्रिल २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांनी लागू केला मनाई आदेशसर्व प्रकारच्या मद्य विक्रीलाही १४ एप्रिलपर्यंत बंदी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहरातील वाहतूकीला यापुढे मनाई आदेशाने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रस्त्यावर येणारी वाहने यापुढे जप्त केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, ठाण्यातील सर्व प्रकारची मद्यविक्रीची दुकानेही १ ते १४ एप्रिल २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.आधी लागू केलेला आदेश ३१ मार्च रोजी संपल्यानंतर पुन्हा नव्याने पोलीस आयुक्तांनी १ ते १४ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू केला आहे. यातून रेशनिंग दुकाने, किराणा माल, दूध, फळे, डेअरी, बेकरी, मांस आणि मासे वाहतूक तसेच यासंबंधी प्रक्रीया उद्योगाला लागणारा कच्चा माल वाहतूक, वीज निर्मिती, प्रिंट आणि इलेक्ट्रानिक प्रसार माध्यमातील प्रतिनिधी, वैद्यकीय, बँक कर्मचारी तसेच जल, हवाई वाहतूक करणारे कर्मचारी आदींसाठी लागू राहणार नाही. विलगीकरण सुविधेसाठी वापरल्या जाणाऱ्या आस्थापना, सुरक्षारक्षक आणि धार्मिक स्थळांची पूजा देखभाल करणाऱ्यांनाही यातून वगळले आहे. मात्र, याव्यतिरिक्त कोणीही रस्त्यावर विनाकारण आल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सायकलसह दुचाकी, जड अथवा कोणतेही वाहन रस्त्यावर आढळल्यास पोलिसांकडून जप्तीची कारवाई केली जाणार आहे.दरम्यान, ठाणे जिल्हयातील बियर शॉप, परमिट रुम, देशी आणि विदेशी अशा सर्व प्रकारची मद्य विक्री करणाºया दुकानेही १ ते १४ एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले आहेत. या काळात कोणीही दुकाने सुरु ठेवली तर त्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस