शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात भाज्यांचे दर प्रचंड कडाडले; ग्राहकांच्या खिशाला चाट, हमाली महागली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 03:40 IST

१० दिवस संपूर्ण ठाणे लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे बुधवारी ठाणेकरांनी जांभळीनाका येथील मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती.

ठाणे : अनलॉक दोन जाहीर झाल्यानंतर ठाणे महापालिकेने मात्र संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी भाजी मार्केटमध्ये ठाणेकरांची गर्दी झाली होती. ती पाहून विक्रेत्यांनी भाज्यांचे दर अचानक वाढवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी विके्रत्यांनी २० रुपयांची कोथिंबिरीची जुडी ८० रुपयांना विकल्याचे दिसून आले. इतर भाज्यांचे भावही दुप्पट ते तिप्पट दराने ते विकत होते. मात्र, वाहतूक आणि हमालांचे दर वाढल्यानेच भाजीचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तर पुढील १० दिवस लॉकडाऊन असल्याने ते लूट करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला.

उद्यापासून १० दिवस संपूर्ण ठाणे लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे बुधवारी ठाणेकरांनी जांभळीनाका येथील मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. परंतु, भाज्यांचे वाढलेले दर पाहून त्यांची झोपच उडाली. प्रत्येक भाजीचे दर हे दुप्पट ते तिप्पट झाल्याने ते हवालदिल झाले होते. आधीच तीन महिन्यानंतर कामाला कुठे सुरुवात झाली होती, पगार कमी झाले आहेत, काहींच्या नोकऱ्यादेखील गेल्या आहेत. अशातच आता विविध वस्तूंच्या वाढत्या दरांमुळे ठाणेकर हैराण झाले. चार दिवसांपूर्वी २० रुपये असलेले दर ४० ते ८० च्या घरात गेले आहेत.भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत, व्यापाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण नाही, शासनाने या वाढणाºया दरांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु, त्याकडे त्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. - प्रकाश ताम्हाणे, ग्राहक ठाणेकर

रोजपेक्षा जास्तीचे दर आकारले जात आहेत. गुरुवारपासून बंद असल्यानेच विक्रेते लूट करीत आहेत. - प्रतिभा माने, गृहिणी, ठाणेकर

१० दिवस लॉकडाऊन होणार म्हणून भाज्यांचे दर वाढवलेले नाहीत. तर वाहतूक आणि आणि हमालांचे दर हे दुप्पट ते तिप्पट झाल्यानेच आमचा नाईलाज असून यामुळेच भाज्यांचे दर वाढलेले आहेत. -भाजी विक्रेते, जांभळीनाका मार्केटआजचे भाज्यांचे दर (रुपयांमध्ये)भाजी - पूर्वी - आताकोबी ३० - ५०शिमला मिर्ची ५० - ८०टॉमेटो ३० - ८०भेंडी ४० - ६०गवार ६० - ८०कोथिंबीर २० - ८०शेपू ३० - ४०काकडी २० - ४०मेथी २० - ४०पालक १० - २०

 

टॅग्स :vegetableभाज्याthaneठाणे