शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

भाज्यांचे दर पुन्हा कडाडले, १० हजार क्विंटलवरुन थेट ५७४५ क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 03:24 IST

डोंबिवली : आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले असून त्यामुळे गृहिणींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

अनिकेत घमंडी डोंबिवली : आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर गगनाला भिडले असून त्यामुळे गृहिणींमध्ये चिंता व्यक्त होत आहे. महिनाभरात सलग तीन ते चार वेळा भाज्यांचे भाव कडाडल्याने आता खायचे तरी काय, असा सवाल विचारत त्यांनी संताप व्यक्त केला.रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून खरीपाच्या पिकांचा शेवट होत आहे. त्यात अवकाळी पावसाने शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आठवडाभर गारवा वाढत गेला. गेल्या तीन दिवसांपासून अचानक उष्मा वाढला. त्याचा परिणाम भाज्यांवर झाला. आवक घटली आणि दर वाढले. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत एरव्ही दहा हजार क्विंटल भाजीपाला येतो. मात्र चार-पाच दिवसांपासून त्यात ४० टक्के घट झाली असून सध्या ५७४५ क्विंटल भाजीपाला येत आहे. त्यामुळेही भाजीपाल्याचे दर कडाडल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे म्हणाले, अपेक्षित नसतानाही रविवार, सोमवारमध्ये पावसाने अचानक हजेरी लावली. त्याआधी महिनाभरापूर्वीच पावसाने शेतपिकाचे नुकसान केले. उभ्या पिकातल्या भाज्यांचा मोहोर गळाला, त्यामुळे हाताशी आलेले पिक गेले. त्यामुळे भाज्यांचे पिक घेणारा शेतकरी दोन महिन्यात हवालदिल झाला आहे. बाजारात घाऊक आणि किरकोळ मालाला मागणी असली, तरी पिक नसल्याने करायचे तरी काय असा सवाल शेतकºयांसमोर आणि भाजी विके्रत्यांसमोर आहे.शहरी भागात रेल्वे स्थानक परिसरात सर्वत्र फेरीवाल्यांवर कारवाई होत आहे. त्यात भाजीविके्रत्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आधीच भाजी मिळत नसल्याने आबालवृद्ध हैराण झालेले असतांनाच आता भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने दुहेरी कोंडी झाली आहे. टोमॅटो ८० ते १०० रुपये किलोंच्या घरात गेला आहे. कडधान्य विकत मिळतात, पण ती तरी किती खायची? २५ रुपये पाव किलो अशा दराने ती मिळतात. कोथिंबिरीची जुडी पाच रुपयाला मिळत होती. आता ती देखील रातोरात कडाडली. अळूची पाने २० रुपयांना सहा ते आठ मिळतात. तो मालही माल कमी असल्याने ग्राहकांची पंचाईत होत आहे.>पालेभाज्याही महागल्याया घाऊक भाजीबाजारातून बदलापूर, वसई, टिटवाळा, डोंबिवली परिसरात सर्वत्र भाजीपाला जातो. जेवढा दळणवळणाचा खर्च जास्त तेवढा भाज्यांचा किलोमागे दर जास्त हे समीकरण असल्याने भाज्यांचे दर अपेक्षेपेक्षा वाढलेले आहेत.प्रत्येक भाजी किरकोळ बाजारात किलोमागे ठिकठिकाणी २० ते २५ रुपये जास्त चढ्या भावानेच विकली जात आहे. त्यामुळे ही तफावत मोठी होत गेली आहे. पालेभाज्याही कडाडल्या आहे.मेथी- ४० रूपये, पालक-१५, मुळा-३५, शेपू- १५ ते २०, कोथिंबिर - २० रुपये, कांदा पात २५ रुपये, कढीपत्ता ३० रुपये हा होलसेलचा भाव आहे.. पण प्रत्यक्षात त्या मूळ किंमतीतही १० ते १५ रुपये जास्त आकारले जातात.>भाज्यांचे घाऊक दरकल्याण कृषी उत्पन्ना बाजार समितीतील भाज्यांच्या होलसेलच्या दरानुसार, (प्रतिकिलो) भेंडी ३६ रुपये, दुधी भोपळा १५रुपये, लाल भोपळा १५ रुपये, फ्लॉवर २० रुपये, कोबी २० रुपये, गवार ४० रुपये, घेवडा ४० रुपये, वांगी ३५ रुपये, वाटाणा ६० रुपये, शिराळी ३५ रुपये, कारली ३५ रुपये, तोंडली २५ रुपये, टोमॅटो ६०रुपये, सुरण २५ रुपये, शेवगा ६० रुपये, काकडी १५ रुपये असा दर आहे.>थंडी वाढायला हवीठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर ही भाजी बाजारासाठी मुख्य बाजारपेठ आहे. नवी मुंबईत एपीएमसी मार्केट असल्याने तेथे पुणे, पनवेल, अलिबाग आदी भागातून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होते. तर कल्याण, डोंबिवलीला नासिक, शहापूर आदी भागातील शेतमालावर अवलंबून रहावे लागते. कल्याणच्या बाजारात भाजीचा मालामध्ये कमालीची घट झाली आहे. उष्णता कमी होऊन थंडीने जोर धरायला हवा; अन्यथा पंधरवडा असाच महागाईचा जाणार असल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :vegetableभाज्याdombivaliडोंबिवली